शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

CoronaVirus News : राज्यात दिवसभरात ६३,७२९ कोरोना रूग्ण, तर मुंबईत ८,२१७ रुग्णांची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 06:48 IST

CoronaVirus News : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात १५ दिवसासाठी निर्बंध लागू करण्यात आले असले तरी संसर्गाचा आलेख वरचाच आहे.

मुंबई : राज्यातील कोरोना बाधितांचे आकडे वाढतच आहे. शुक्रवारी दिवसभरात ६३ हजार ७२९ नवीन कोरोना रूग्णांची भर पडली आहे. तर, ३९८ कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात १५ दिवसासाठी निर्बंध लागू करण्यात आले असले तरी संसर्गाचा आलेख वरचाच आहे. शुक्रवारी राज्यात ६३ हजार ७२९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून आता राज्यातील काेरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ३७ लाख ३ हजार ५८४ झाली आहे. तर, एकूण ६ लाख ३८ हजार ३४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण ८१.१२ टक्क्यांवर आले आहे. आज ४५ हजार ३३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण ३० लाख ४ हजार ३९१ काेरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. दिवसभरात ३९८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून आतापर्यंत ५९ हजार ५५१ नागरिकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ३३ लाख ८ हजार ८७८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३७ लाख ३ हजार ५८४ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. 

मुंबईत शुक्रवारी ८,२१७ रुग्ण, ४९ मृत्यूशुक्रवारी मुंबईत ८,२१७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली, तर एका दिवसात तब्बल १० हजार ९७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र, मृत्यूच्या आकड्यात वाढ झाली असून, ४९ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर सक्रिय रुग्णांचा आकडा ८५ हजार ४९४ इतका आहे. 

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे पाच हजार ३९ रुग्ण कोरोना रुग्णसंख्येत  शुक्रवारी पाच हजार ३९ झाली आहे. ९ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात चार लाख सहा हजार ९३ रुग्णसंख्या असून, सहा हजार ८६४ मृत्यूंची नोंद झाली आहे. ठाणे शहरात एक हजार ४१० रुग्ण आढळले आहेत.  कल्याण-डोंबिवलीत एक हजार ४३७ रुग्ण आढळले असून, पाच मृत्यू झाले.उल्हासनगरला १५७ रुग्ण सापडले भिवंडीला ५५ रुग्ण आढळले असून, एक मृत्यू आहे. मीरा-भाईंदरला ४६२ रुग्ण सापडले असून, नऊ मृत्यू झाले आहेत. अंबरनाथ शहरात १४० रुग्ण सापडले असून, तीन मृत्यू झाले. बदलापूरमध्ये २११ रुग्ण सापडले आहेत.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस