शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: १०३ वर्षांच्या आजोबांनी कोरोनाला हरवले; जीवनाची सुरू केली नवीन इनिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 08:54 IST

शेतातील फलाहार आणि भाजीपाल्यानेच ठणठणीत

- सदाशिव मोरे, आजरालाकूडवाडी (ता. आजरा) येथील बाबू रानबा गिलबिले या १०३ वर्षांच्या आजोबांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. एका बाजूला गावातील कोरोनाबाधितांचा होणारा मृत्यू आणि दुसऱ्या बाजूला १०३ वर्षांच्या आजोबांनी कोरोनाला हरवून आपले जीवन पुन्हा एकदा सुरू केले आहे. आजऱ्यातील दोन्ही कोविड सेंटरनी आजोबांना दाखल करून घेतले नाही. तर गडहिंग्लजच्या उपजिल्हा रुग्णालयात दोन दिवसांनी मोठ्या हॉस्पिटलला घेवून जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे मुलगा व सून यांनी त्यांना शेतात आणले. शेतातील मुबलक ऑक्सिजन व वेळेवर मिळालेला फलाहार व भाजीपाला यामुळे आजोबा ठणठणीत झाले आहेत.बाबू गिलबले यांना १८ मे रोजी श्वसनाचा त्रास सुरू झाला. त्यांना तातडीने आजरा कोविड सेंटरमध्ये आणण्यात आले. त्या ठिकाणी आॅक्सिजन बेड शिल्लक नाही. तीच अवस्था रोझरी सेंटरचीही होती. आजोबांची ऑक्सिजन पातळी ७० इतकी होती. त्यामुळे त्यांना गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात  दाखल करण्यात आले. तेथे ऑक्सिजन लावल्यानंतर बाबू गिलबिले यांची ऑक्सिजन पातळी ८० पर्यंत गेली. मात्र त्या ठिकाणचे पेशंट पाहून बाबू गिलबिले अस्वस्थ झाले. मुलगा चंद्रकांत यांना घरी घेवून जाण्याची ते सारखी विनंती करू लागले व तोंडाचा ऑक्सिजन काढून टाकू लागले. कॉटला बांधून सर्व त्रास सहन करीत तीन दिवस त्या ठिकाणी बाबू गिलबिले यांना ठेवण्यात आले. त्यांच्यासोबत मुलगा चंद्रकांतही तेथेच राहिले. मात्र नाईलाज झाल्याने मुलगा चंद्रकांत व सून वत्सला यांनी आजोबांना आपल्या शेतात घेवून जाण्याचा निर्णय घेतला. आजोबांना घेवूनच या दोघांनी शेतातच सेवा करण्यास सुरुवात केली.डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या, औषधे, नारळाचे पाणी, चिक्कू व आंब्याचा रस आणि सकाळ, संध्याकाळ अंडी खाऊन आजोबा ठणठणीत झालेत. आता त्यांची अॉक्सिजनची पातळी ९८ इतकी आहे. सध्या ते शेतात सर्वत्र फिरत असून त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास नाही. त्यांनी कोरोनाला हरविले आहे. लहानपणापासून बाबू गिलबिले हे मल्ल होते. लाठीकाठी, कबड्डी व मलखांबची त्यांना आवड होती. दहा वर्षांपूर्वी ते रायगडावर स्वत: चालत गेले आहेत.उपचारासाठी गेले व मृत झाले...लाकूडवाडी गावातील अनेकजण गडहिंग्लज येथे कोरोनाच्या उपचारासाठी गेले. उपचार सुरू असतानाच ८ जण मृत झाले आहेत. मात्र १०३ वर्षांचे बाबू गिलबिले या आजोबांनी कोरोनावर मात करून आपल्या जीवनाची नवीन इनिंग सुरू केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या