शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

CoronaVirus News : राज्यात १ लाख ३५ हजार कोरोना रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 04:19 IST

CoronaVirus News : सध्या राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ४९.८६ टक्के असून मृत्यूदर ४.६३ टक्के एवढा आहे.

मुंबई : राज्यात सोमवारी ३ हजार ७२१ रुग्णांची नोंद झाली असून ६२ मृत्यू झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या १ लाख ३५ हजार ७९६ झाली असून बळींचा आकडा ६,२८३ झाला आहे. राज्यात दिवसभरात १,९६२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत ६७ हजार ७०६ जण ‘कोविड’मुक्त झाले आहेत. सध्या राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ४९.८६ टक्के असून मृत्यूदर ४.६३ टक्के एवढा आहे.सध्या राज्यात ६१ हजार ७९३ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात नोंद झालेल्या ११३ मृत्यूंपैकी ६२ मृत्यू हे मागील ४८ तासांतील आहेत. तर ५१ मृत्यू हे त्या पूर्वीच्या काळातील आहेत. ६२ मृत्यूमध्ये मुंबई २०, कल्याण डोंबिवली मनपा १, उल्हासनगर मनपा १, मीरा भार्इंदर मनपा १३, पालघर १, मालेगाव मनपा ८, पुणे १, पुणे मनपा ९, पिंपरी चिंचवड मनपा १, औंरगाबाद ४, लातूर १, अकोला मनपा २ अशांचा समावेश आहे. तर ५१ मृत्यू दैनंदिन स्वरूपात न दाखविता त्यांचा तपशील प्रगतिपथावर असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या ६७ हजार ५८६ झाली आहे. तर सध्या सक्रिय रुग्णांची संख्या २९ हजार ७२० एवढी आहे. मुंबईत आतापर्यंत ३४,१२१ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. आजपर्यंत पाठविलेल्या ७ लाख ८७ हजार ४१९ कोविड नमुन्यांपैकी १७.२४ टक्के नमुने पॉझिटिव्ह आहेत. तर सध्या ६ लाख १ हजार १८२ लोक होम क्वारंटाइमध्ये असून २६,९१० लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.>मुंबईत ६७ हजार ५८६ रुग्णमुंबई : मुंबईत दिवसभरात १ हजार १२८ रुग्णांचे निदान झाले असून रुग्णसंख्या ६७ हजार ५८६ झाली आहे, तर सोमवारी २० मृत्यू झाले असून, बळींचा आकडा ३७३७ झाला आहे. दिवसभरात ६२८ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत ३४ हजार १२१ जण ‘कोविड’मुक्त झाले आहेत. मुंबईत रुग्णदुपट्टीचा दर ३७ दिवसांवर गेला आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५० टक्के झाले आहे. तर गेल्या आठवड्याभरात कोविडवाढीचा दर १.८८ टक्के आहे. रविवारपर्यंत मुंबईत कोविडच्या २ लाख ९१ हजार ५९० चाचण्या झाल्या आहेत.शहर उपनगरातील पालिका रुग्णालयांत सोमवारी ८६३ कोविड संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. आतापर्यंत ४७ हजार ८७० संशयित रुग्णांना रुग्णालयांत भरती करण्यात आले आहे.

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस