शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: आर्थिक कोंडी झालेला नाभिक समाज आंदोलनाच्या पवित्र्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 02:01 IST

मंत्र्यांनी आश्वासन पाळावे । व्यवसायासाठी हवी परवानगी

पुणे : लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या नाभिक समाजाची उपासमार सुरू आहे. आर्थिक कोंडीतून सुटका कशी होणार, या विवंचनेने अनेकांचा धीर सुटू लागला आहे. सांगली जिल्ह्यात त्यातूनच बापलेकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. एकंदर समाजाची ही बिकट परिस्थिती लक्षात घेऊन मंत्रिमंडळात विषय घेऊन त्यावर निर्णय घेण्याचे आश्वासन मंत्र्यांकडून देण्यात आले आहे. दिलेला हा शब्द पाळला गेला नाही तर राज्यभर ‘जेलभरो’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रीय नाभिक महासंघाने दिला आहे.लॉकडाऊनमध्ये ७० दिवसांहून अधिक काळ दुकाने बंद ठेवल्याने दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न उभा राहिला आहे. अशावेळी अनेक संघटनांनी शासनाकडे दाद मागितली. मात्र, त्याला प्रतिसाद न लाभल्याने राज्यभरातील नाभिक संघटनांनी काळी फीत लावून सरकारचा निषेध केला. राज्यातील सलून व ब्यूटी पार्लर दुकानांपैकी ७० टक्क्यांहून अधिक दुकाने भाडेतत्त्वावर आहेत. त्याचे भाडे देणे शक्य नसल्याने काय करावे, या विवंचनेत सलून व्यावसायिक आहेत.आर्थिक उत्पन्न सुरू होण्यासाठी नियमाप्रमाणे दाढी आणि केशकर्तनास परवानगी मिळावी, प्रत्येक नाभिक व्यावसायिकाला शासनाने दहा हजार रुपयांचे अर्थसाह्य करावे, शासनाने कारागिरांचा विमा उतरवावा, आदी मागण्या राष्ट्रीय नाभिक महासंघ आणि महाराष्ट्र नाभिक महामंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केल्या आहेत.काय आहे परिस्थिती?राज्यातील नाभिक समाजाची संख्या सुमारे ५० लाख आहे. यातले साधारण २५ लाख पारंपरिक व्यवसाय करतात. यात केशकर्तनालय, ब्यूटी पार्लर यांचा समावेश आहे. आंध्र प्रदेश, गुजरात व अन्य ठिकाणी काही अंशी व्यवसाय सुरू असल्याची माहिती नाभिकांनी दिली.नाभिक व्यावसायिकांना शासनाने तातडीने व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी. महामंडळाने आतापर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार सुप्रिया सुळे, विधानसभेचे सभापती नाना पटोले तसेच अनेक मंत्र्यांना निवेदन दिले आहे. मंत्रिमंडळातील बैठकीत नाभिकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याचे आश्वासन मिळाले आहे. यातून मार्ग निघाला नाही तर आंदोलनशिवाय पर्याय उरणार नाही.’’- भगवानराव बिडवे, राष्ट्रीय अध्यक्ष नाभिक महासंघ.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या