शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

आई ती आईच! फुफ्फुसात १०० टक्के संसर्ग झालेल्या कोरोनाबाधित मातेने दिला बाळाला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 08:43 IST

मांडीवर ठेऊन डॉक्टरांनी तिचे वाढवले मनोबल

बारामती (पुणे) :  शेवटी ‘आई ती आईच’ असते. तिची जागा कोणीच घेऊ शकत नाही. आईची व्याख्या अधोरेखित करणारी अनोखी घटना बारामतीत घडली आहे. फुफ्फुसात १०० टक्के संसर्ग झालेल्या कोरोनाबाधित गर्भवती महिलेने तत्पर उपचार आणि तीव्र इच्छाशक्तीच्या बळावर बाळाला सुखरूप जन्म दिला आहे. डॉक्टरांनी व्हेंटिलेटरवर असलेल्या  या मातेच्या मांडीवर नवजात बालकाला ठेवत तिचे मनोबल वाढविले. 

बारामती येथील मेहता हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या पथकाने ही किमया साधली आहे. ६ एप्रिल रोजी  गरोदर २८ वर्षीय  महिला रुग्णालयात दाखल झाली. ती मूळची देऊळगाव राजे येथील शेतकरी कुटुंबातील असून तिला ३ वर्षांची एक मुलगी आहे. तिचे संपूर्ण कुटुंब कोरोनाबाधित होते. तिला दाखल करताना कोविडमुळे ताप, खोकला, धाप लागणे असा त्रास होता. ऑक्सिजन पातळी ९० ते ९२ दरम्यान होती. दोन- तीन दिवसांनी ऑक्सिजन पातळी आणखी खालावली. उपचारादरम्यान तिला ऑक्सिजनची गरज भासू लागली. १० एप्रिल रोजी ती अत्यवस्थ झाली. तिला व्हेंंटिलेटरवर घेण्याची वेळ आली. महिलेचा एचआरसीटी स्कोअर २५ असल्याने अतिशय नाजूक अवस्था होती. रक्ताचा अहवालही चांगला नव्हता. त्यातच तिला प्रसूतिकळा सुरू झाल्या. 

आधीचे सिझर असल्याने आतादेखील सिझरच करणे गरजेचे होते. ती व्हेंटिलेटरवर असतानाही डॉक्टरांनी निर्णय घेत कोरोना संसर्गाचा धोका पत्करून गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पडली. तिची सुखरूप प्रसुती झाली आणि  तिने सुदृढ मुलीला जन्म दिला.

त्याची चाचणी आली निगेटिव्हबाळाला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. या बाळाची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. यानंतर ती महिला पुढील १३ दिवस व्हेंंटिलेटरवर अतिदक्षता विभागात अत्यवस्थ होती. या दरम्यान तिचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला. ती व्हेंटिलेटरवर असताना तिच्या मांडीवर बाळ दिले. यामुळे रुग्णाची जगण्याची इच्छा प्रबळ झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

४५ दिवसांच्या उपचारानंतर ती महिला कोरोनामुक्त होऊन प्रकृती चांगली झाली आहे. बाळही सुखरूप आहे. - डॉ. विशाल मेहता 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या