शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

CoronaVirus News: राज्यात सर्वाधिक लक्षणेविरहित रुग्ण; केवळ एक टक्का गंभीर अवस्थेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 03:27 IST

CoronaVirus News: वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाची माहिती

मुंबई : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, ही चिंतेची बाब असली, तरी १४ लाख ४२ हजार ९६८ कोरोनाग्रस्तांपैकी तब्बल २ लाख ३१ हजार ५२८ रुग्ण एकही लक्षण नसलेले आणि सौम्य लक्षण असलेले आहेत. ज्याचे प्रमाण १६ टक्के आहे.राज्यात ११ लाख ४९ हजार ६०३ रुग्ण म्हणजे एकूण ८० टक्के कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात फक्त एक टक्का म्हणजे ९,७५७ गंभीर रुग्ण आहेत. दरम्यान, १३,९९६ एवढे रुग्ण आयसीयू बाहेरील असून, आॅक्सिजनवर आहेत. त्यांचेही प्रमाण १ टक्का आहे, तर आतापर्यंत ३८,०८४ रुग्णांनी कोरोनामुळे जीव गमावला असून, राज्यातील मृत्युदर या आकडेवारीनुसार २ टक्के आहे.राज्यात २ लाख ५८ हजार १०८ रुग्ण सक्रिय आहेत. त्यातही लक्षण नसलेल्या, सौम्य लक्षणे असलेल्या, तसेच बरे होत असलेल्या रुग्णांचे प्रमाण ९१ टक्के आहे. गंभीर रुग्णांची संख्या १३,९९६ असून, हे प्रमाण ५ टक्के आहे. आयसीयूबाहेर पण आॅक्सिजनवर असलेल्या रुग्णांचे प्रमाण ४ टक्के आहे.राज्यातील २ लाख ३१ हजार ५२८ रुग्ण हे लक्षण नसलेले, सौम्य लक्षणांसह बरे होण्याच्या मार्गावर आहेत. हे प्रमाण ९१ टक्के आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग झाला, तरी तो नियंत्रणात येऊ शकतो, हा दिलासा मिळाला आहे.निवासस्थानीच विलगीकरणाचा सल्लामागील काही दिवसांमध्ये सौम्य लक्षणे असलेल्या किंवा पॉझिटिव्ह असूनही कोणत्याही प्रकारची लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. हे रुग्ण संसर्ग पसरविण्यासाठी सक्रिय असतात का, यावरही ठोस अभ्यास सुरू असून, हे रुग्ण काही प्रमाणात संसर्ग पसरवू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांच्या घरी संबंधित सुविधा असल्यास निवासस्थानीच विलग राहण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या