शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
4
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
5
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
6
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
7
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
8
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
9
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
10
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
11
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
12
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
13
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
14
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
15
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?
16
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
17
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
18
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
19
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
20
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा

Coronavirus : राज्यातील पाच जिल्ह्यांत सर्वाधिक सक्रिय रुग्ण, पुण्याची आघाडी, मुंबई, ठाण्यात अधिक सक्रिय रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 10:03 IST

Coronavirus in Maharashtra: सध्या राज्यात ३३ हजार १५९ सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी पाच जिल्ह्यांत अजूनही चिंता कायम असून पुणे गेल्या दोन महिन्यांपासून अव्वल यादीत आहे.

मुंबई : राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांमध्ये मोठ्या संख्येने घट झाल्याची दिलासादायक बाब कोविड रुग्णसंख्येवरुन स्पष्ट दिसत आहे.  राज्यात १७ सप्टेंबर २०२० रोजी तीन लाख १ हजार ७५२ सक्रिय रुग्ण होते. ही संख्या २२ एप्रिल २०२१ मध्ये दुप्पट होऊन ६ लाख ९९ हजार ८५८ वर पोहोचली; मात्र आता एप्रिलनंतर या संख्येत घट होऊन ५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत ३३ हजार १५९ वर पोहोचली.

राज्यात सक्रिय रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात घट नोंदवण्यात आली आहे. जून महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट ओसरु लागली. त्यानंतर दरदिवशी १० हजारांच्या दरम्यान रुग्णसंख्या होती; मात्र आता ऑगस्टनंतर ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपर्यंत दैनंदिन रुग्णसंख्या थेट दोन ते अडीच हजारांच्या दरम्यान आहे. सध्या राज्यात ३३ हजार १५९ सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी पाच जिल्ह्यांत अजूनही चिंता कायम असून पुणे गेल्या दोन महिन्यांपासून अव्वल यादीत आहे.

सर्वाधिक सक्रिय रुग्णांच्या जिल्ह्यांच्या यादीत पुणे जिल्हा आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ मुंबईचा क्रमांक लागतो. त्यानंतर अहमदनगर, ठाणे, सातारा या जिल्ह्यांमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या अधिक नोंदवण्यात आली आहे. या पाच जिल्ह्यांतून ७४ टक्क्यांहून अधिक सक्रिय रुग्णांची नोंद केली जात आहे.

राज्यात २% रुग्ण व्हेंटिलेटरवर आतापर्यंत ३३ हजार ४४९ सक्रिय रुग्णांपैकी २.७४ टक्के म्हणजेच ९२२ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर जवळपास ६.५४ टक्के आयसीयूमधील रुग्ण असून २,२०५ एवढे आहेत तर ५,४५४ गंभीर रुग्ण असून याचे प्रमाण १६.२१ टक्के आहे तर ५६ टक्क्यांहून अधिक लक्षणविरहित किंवा सौम्य लक्षणे असलेले रुग्ण आहेत. 

राज्यात आठ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना लसआतापर्यंत राज्यात एकूण ८ कोटी ७७ लाख २३ हजार ६२ लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. राज्यात १२ लाख ९३ हजार ६२८ आऱोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस, तर १० लाख ९६ हजार ८५७ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबई