शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

CoronaVirus News: चिंता वाढली! राज्यात १ लाख ४,५६८ रुग्ण; दिवसभरात ११३ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 06:42 IST

मृतांमध्ये मुंबईतील ६९ आणि सोलापुरातील तब्बल १० जणांचा समावेश

मुंबई : राज्यात लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य सरकारसह सर्वांचीच चिंता वाढली आहे. शनिवारीदेखील नवीन रुग्णसंख्येने तीन हजारांचा टप्पा ओलांडला. तब्बल ३,४२७ रुग्ण आढळून एकूण बाधितांची संख्या १ लाख ४ हजार ५६८ झाली आहे. दिवसभरात ११३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये मुंबईतील ६९ आणि सोलापुरातील तब्बल १० जणांचा समावेश आहे.मुंबई, पुण्यासह राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये संसर्ग वाढत आहे. जळगाव जिल्ह्यात नवीन ७५ रुग्ण आढळल्याने एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १,६६३ झाली आहे. सोलापूरात ५१ नवे रुग्ण आढळून एकूण रुग्णसंख्या १६६३ झाली आहे. दिवसभरात मृत्यू पावलेल्या ११३ जणांमध्ये ७३ पुरुष तर ४० महिला आहेत. त्यामध्ये मुंबई ६९, कल्याण-डोंबिवली १, नवी मुंबई ८, पुणे १०, सोलापूर ८, औरंगाबाद ३, लातूर २ आणि नांदेड १, यवतमाळ १, सातारा १, पनवेल ६, ठाण्यातील ३ रुग्णांचा समावेश आहे.दुसरीकडे १ हजार ५५० रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर आतापर्यंत एकूण ४९ हजार ३४६ जण कोविडमुक्त झाले आहेत. सध्या राज्यात ५१ हजार ३७९ सक्रिय रुग्ण असून त्यामध्ये एकट्या मुंबईत २८ हजार ७६३ रुग्ण आहेत.आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६ लाख ४१ हजार ४४१ नमुन्यांपैकी १६.३ टक्के नमुने म्हणजे १,०४,५६८ नमुने पॉझिटिव्ह असल्याची माहिती सूत्रांनी दिली.माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांना लागणमाजी मंत्री व खासदार भाजपचे नेते जगन्नाथ पाटील यांना कोरोनाची लागण झाली असून उपचारासाठी मुलुंड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पंचाहत्तरी ओलांडलेले पाटील हे डोंबिवली पूर्वेला राहत असून त्या परिसरात कोरोनाचे जास्त रुग्ण आढळले आहेत.धनंजय मुंडेच्या संपर्कातील आणखी दोघांना बाधा; कुटुंबातील कुणालाही संसर्ग नाहीसामाजिक न्याय मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे कोरोनाबाधित झाल्यानंतर कुटुंबातील सर्वच सदस्यांचे अहवाल निगेटिव्ह आले; परंतु त्यांच्या संपर्कातील आणखी दोघांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले. परळीजवळील माधवबाग भागातील एक ३५ वर्षीय व्यक्ती आणि मुंबईत आणखी एकाचा त्यामध्ये समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या