शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

CoronaVirus: “रेमडेसिवीरच्या केवळ घोषणा, कुणाकडे टाहो फोडायचा, हे सरकार नावाच्या मुर्दाड यंत्रणेने सांगावं”

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 7:08 PM

CoronaVirus: रेमडेसिवीर इंजेक्शनच्या कमतरतेवरून मनसेने राज्य सरकारवर टीका केली आहे.

ठळक मुद्देमनसेची राज्य सरकारवर टीकारुग्णांच्या नातेवाईकांनी कोणाकडे टाहो फोडायचारेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्यावरून साधला निशाणा

मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भयानक स्थिती संपूर्ण देशात पाहायला मिळत आहे. ऑक्सिजन, कोरोना लस, रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. राज्य सरकारकडून हा तुटवडा लवकरच भरून निघेल, असे आश्वासन सातत्याने दिले जात असले, तरी अनेक ठिकाणी परिस्थिती बिकट असल्याचे दिसून येत आहे. अशातच आता आरोप-प्रत्यारोप सुरू असून, मनसेनेराज्य सरकारवर टीका केली आहे. (coronavirus mns gajanan kale criticises thackeray govt on remdesivir injection)

रुग्णांच्या नातेवाईकांना अजूनही रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नाहीय. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची प्रचंड वणवण होत आहे. अनेक मेडिकल बाहेर रुग्णांच्या नातेवाईकांच्या तासंतास रांगा लागल्या आहेत. तर काही ठिकाणी इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याचे म्हटले जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबईचे अध्यक्ष गजानन काळे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. 

रुग्णांच्या नातेवाईकांनी कोणाकडे टाहो फोडायचा

आजच्या दिवसात नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील एकाही खाजगी रुग्णालयला ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडून एकही रेमडेसिवीर देण्यात आले नाही. म्हणजेच ठाणे, मिरा भाईंदर, कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर या मनपातील खाजगी रुग्णालयांनाही एकही रेमडेसिवीर आज मिळाले नाही. रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याबाबतच्या फक्त घोषणा करण्यात आल्या, अशी टीका गजानन काळे यांनी केली आहे. तसेच काळ्या बाजारात उपलब्ध नाही आणि शासकीय यंत्रणा जबाबदारी घेऊन पुरवत नाहीत. आता रुग्णांच्या नातेवाईकांनी कोणाकडे टाहो फोडायचा तेही एकदा सरकार नावाच्या मुर्दाड यंत्रणेने सांगावे, या शब्दांत दुसऱ्या एका ट्विटमध्ये संताप व्यक्त केला आहे. 

मोफत लसीकरणासाठी BMC च्या एफडी मोडा; शिवसेना खासदाराचे उद्धव ठाकरेंना पत्र

दरम्यान, ऑक्सिजन, वैद्यकीय उपकरणे, व्हेंटिलेटर, बेड, औषधे या स्वरूपात इतर देशांतून मदत केली जात आहे. भारतातील करोना संकटाला थोपवण्यासाठी आता अमेरिकेतील ४० कंपन्यांच्या सीईओने पुढाकार घेतला आहे.  या सीईओंनी एका टास्क फोर्सची स्थापना केली आहे. या माध्यमातून भारताला आवश्यक साधनसामुग्रीची मदत केली जाणार आहे. अलीकडेच गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि भारतीय वंशाचे उद्योजक सुंदर पिचाई यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर १३५ कोटींच्या मदतीची घोषणा केली. तर दुसरीकडे मायकोसॉफ्टचे प्रमुख सत्या नडेला यांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसremdesivirरेमडेसिवीरMNSमनसेState Governmentराज्य सरकार