शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: महाराष्ट्रात पुन्हा मास्कसक्ती?; लवकरच निर्णय होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 09:13 IST

दिल्ली, कर्नाटक तसेच इतर काही राज्यांमध्ये कोविड संसर्गात वाढ होत असून, त्याविषयी महाराष्ट्रातील राज्य टास्क फोर्सने चिंता व्यक्त केली आहे

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढताना दिसत असून, या पार्श्वभूमीवर राज्यात बंदिस्त ठिकाणी (इनडोअर) मास्क वापराची सक्ती करण्याचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. तशी शिफारस राज्य टास्क फोर्सने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. तसेच लसीकरण मोठ्या प्रमाणात वाढविण्याच्या गरजेवर भर दिला आहे. 

दिल्ली, कर्नाटक तसेच इतर काही राज्यांमध्ये कोविड संसर्गात वाढ होत असून, त्याविषयी महाराष्ट्रातील राज्य टास्क फोर्सने चिंता व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी टास्क फोर्सची सोमवारी रात्री बैठक घेतली. तेव्हा ही चिंता त्यांच्या कानावर घालण्यात आली.  मास्कचा वापर वाढविणे, लसीकरणाला आणखी वेग देणे, रुग्णांचा शोध घेणे, जिनोम सिक्वेन्सिंगवर भर देणे आवश्यक आहे, असे टास्क फोर्सने सांगितले.  

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सची बैठक घेतली. या बैठकीत राज्यात बंदिस्त ठिकाणी मास्क वापराची सक्ती करण्याबाबतची शिफारस टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. डॉ.संजय ओक, डॉ.शशांक जोशी, तसेच इतर सदस्य बैठकीला उपस्थित होते. सध्या संसर्ग झालेली व्यक्ती ही रॅपिड टेस्ट करून स्वत:वर घरच्या घरीच उपचार करून घेत आहे. त्यांना विलगीकरणातील आवश्यक उपचार घेणे गरजेचे आहे. मात्र, तसे होताना दिसून येत नाही, असे निरीक्षणही टास्क फोर्सच्या सदस्यांनी नोंदविले आहे.

टास्क फोर्सच्या सूचनाकिमान बंदिस्त ठिकाणी मास्क लावणे बंधनकारक करावे. विशेषत: चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मॉल्स अशा ठिकाणी संसर्गाचा धोका लक्षात घेता, या ठिकाणी मास्क बंधनकारक पाहिजेत. विमान कंपन्या प्रवाशांना मास्क वापराविषयी वारंवार सांगतात, तशाच पद्धतीने रुग्णालयांमध्येही मास्कचा वापर प्राधान्याने सुरू करण्याविषयी सूचना देणे आवश्यक आहे. राज्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर देणे आवश्यक आहे. दुसऱ्या डोसनंतर बूस्टर डोस घेण्यासाठी २७० दिवसांचे अंतर कमी करून १८० दिवसांवर आणावे.

भविष्यात विषाणूचे काही परिवर्तित प्रकार येऊ शकतात. त्यामुळे अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. सर्वच विषाणूचे प्रकार ओमायक्रॉन इतके सौम्य असतीलच असे नाही. त्यामुळे मास्क घालणे व लसीकरण करणे हाच सर्वात प्रभावी उपाय आहे, असे टास्क फोर्सने स्पष्ट केले. विषाणूचे परिवर्तित प्रकार जाणून घेण्यासाठी व अधिक चांगली उपाययोजना करण्यासाठी जिनोम सिक्वेन्सिंगचे निकाल वेळेवर मिळणेही गरजेचे आहे. त्यामुळे अशा प्रयोगशाळांची संख्या वाढवावी, असे टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांना सांगितले.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस