शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या १ लाखाच्या पुढे; देशातील एक तृतीयांश रुग्ण महाराष्ट्रात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 20:24 IST

आज राज्यात ३ हजार ४९३ कोरोना रुग्णांची नोंद; गेल्या २४ तासांत १ हजार ७१८ रुग्णांची कोरोनावर मात

मुंबई: राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा एक लाखाच्या पुढे गेला आहे. आज राज्यात कोरोनाचे ३ हजार ४९३ रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा १ लाख १ हजार १४१ वर पोहोचला. गेल्या २४ तासांत १ हजार ७१८ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले. तर दिवसभरात १२७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा सातत्यानं वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यात झपाट्यानं वाढ होत आहे. आज राज्यात जवळपास पावणे दोन हजार रुग्ण कोरोनातून बरे झाले. मात्र त्याचवेळी दुप्पट रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत राज्यात ४७ हजार ७९३ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा साडे तीन हजारांहून अधिक आहे. राज्यानं आज कोरोना बाधितांच्या बाबतीत १ लाखाचा टप्पा ओलांडला. यातील निम्माहून अधिक रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईतील रुग्णांची संख्या ५४ हजारांच्या पुढे आहे. त्या खालोखाल रुग्णसंख्या ठाणे आणि पुण्यात आहे. या शहरांमधील रुग्णसंख्या अनुक्रमे १५ हजार आणि १० हजारांहून अधिक आहे. औरंगाबाद, पालघर, नाशिक, रायगड, सोलापूर, जळगाव जिल्ह्यांमधील कोरोना रुग्णांची संख्या हजारपेक्षा अधिक आहे.देशातील एक तृतीयांश कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा जवळपास तीन लाख इतका आहे. महाराष्ट्रपाठोपाठ तमिळनाडूचा क्रमांक लागतो. तमिळनाडूत कोरोनाचे ४० हजारांहून अधिक रुग्ण आहेत. त्यानंतर दिल्ली (३४ हजार), गुजरात (२२ हजार), उत्तर प्रदेश (१२ हजार) यांचा क्रमांक लागतो. मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' घोषणांमुळे गोंधळ वाढला; फडणवीसांचा ठाकरेंवर बाणसावधान! 'या' महिन्यात भारतात कोरोना टोक गाठणार; वरिष्ठ डॉक्टरांकडून धोक्याचा इशारालॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांनी केला मोठा खुलासा, म्हणाले...

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या