शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus In Maharashtra : गेल्या २४ तासांत २८, ४३८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.६९ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 21:27 IST

CoronaVirus In Maharashtra : महाराष्ट्रात आज ५२,८९८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ४९,२७,४८० कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून मुंबईत रुग्णसंख्येत मोठी घट होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत ९५३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासूनस कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. तसेच, नव्या कोरोना बाधितांची संख्या सुद्धा कमी होत असल्यामुळे राज्यासाठी ही एक दिलासादायक बाब ठरली आहे. मात्र, मृतांच्या संख्येत दिवसेंदिवस चढउतार होताना दिसत असल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. (Maharashtra reports 28,438 new COVID19 cases, 52,898 discharges and 679 deaths in the last 24 hours)

महाराष्ट्रात आज ५२,८९८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ४९,२७,४८० कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९०.६९% एवढे झाले आहे.

राज्यात दिवसभरात २८ हजार ४३८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर राज्यात आज ६७९ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५४% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,१५,८८,७१७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५४,३३,५०६ (१७.२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३०,९७,१६१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २५,००४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ४,१९,७२७  ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

मुंबईत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण तिप्पटगेल्या काही दिवसांपासून मुंबईत रुग्णसंख्येत मोठी घट होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत ९५३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर २ हजार २५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईत नव्या कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण तिप्पट झाले आहे. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ९३ टक्क्यांवर पोहचला आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत ४४ कोरोनाबाधित रुग्णांनी आपला प्राण गमावला आहे. तर कोरोना रुग्णांचा दुपटीचा दर हा २५५ दिवसांवर पोहचला आहे.

पुण्यात १ हजार ०२१ नवे करोनाबाधितपुण्यात २४ तासांत १ हजार ०२१ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ६१ हजार ००८ इतकी झाली आहे. त्याचवेळी आज दिवसभरात पुण्यात ४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा देखील वाढून ७ हजार ७९५ इतका झाला आहे. २४ तासात पुण्यात २ हजार ८९२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आजपर्यंत अशा डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ४ लाख ३६ हजार ६९० इतकी झाली आहे.

ठाणे जिल्ह्यात ५० जणांचा मृत्यूठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ७६७ ने वाढली असून ५० जणांचा मंगळवारी मृत्यू झाला आहे.  जिल्ह्यात आजपर्यंत पाच लाख तीन हजार २५३ रुग्णांची व आठ हजार ५८३ मृतांची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या