शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

coronavirus: मुंबई-पुण्यासह रेड झोनमध्ये ३१ मेपर्यंत लॉकडाउन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 06:44 IST

ज्या ठिकाणी रेड झोन आहे व जेथे कोरोनाबाधितांची संख्या रोज नव्याने वाढत आहे, त्या ठिकाणी ३१ मेपर्यंत लॉकडाउन वाढविण्यावर महाविकास आघाडीच्या समन्वय समितीत एकमत झाले आहे.

- अतुल कुलकर्णीमुंबई : महाराष्ट्रात सध्या ज्या ठिकाणी रेड झोन आहे व जेथे कोरोनाबाधितांची संख्या रोज नव्याने वाढत आहे, त्या ठिकाणी ३१ मेपर्यंत लॉकडाउन वाढविण्यावर महाविकास आघाडीच्या समन्वय समितीत एकमत झाले आहे. तसा प्रस्ताव आता केंद्र सरकारला राज्याकडून पाठविला जाणार आहे. त्यासोबतच कोणत्या भागात रेड झोन जाहीर करायचा, याचे अधिकार राज्य सरकारला असावेत, असेही या पत्रात लिहिण्यात आले.महापौर बंगल्यावर झालेल्या बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, बांधकाममंत्री अशोक चव्हाण, जलसंपदामंत्री जयंत पाटील उपस्थित होते. परदेशातून काही उद्योजक महाराष्ट्रात उद्योग काढण्यासाठी उत्सुक आहेत. त्याकरिता राज्याच्या उद्योग विभागाचे धोरण कसे असावे, यावरही या बैठकीत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती मंत्री चव्हाण यांनी दिली. तसेच परिवहन विभागाची कार्यालये विविध जिल्ह्यांमध्ये सुरू करण्याच्या दृष्टीने व महसुलात वाढ करण्यासाठी कोणकोणते विभाग कोणत्या झोनमध्ये सुरू करता येतील, यावरही चर्चा झाल्याचे चव्हाण म्हणाले. मुंबईत लोकल सुरू झाल्या तर परिस्थितीवर नियंत्रण आणणे कठीण जाईल. मात्र, सरकारी कार्यालयांमध्ये जेवढे लोक येणे आवश्यक आहे किंवा आरोग्य सेवा, पोलीस प्रशासन, महापालिकेचे कर्मचारी यांच्यासाठी लोकल सुरू ठेवताना मर्यादित फेऱ्या चालवाव्यात. ओळखपत्र किंवा विशेष पासशिवाय लोकलमध्ये प्रवेश देऊ नये. या अटीवर त्या सुरू करण्याची शिफारसही राज्याने केंद्र सरकारला केली आहे. १८ मे रोजी सोमवारी पुन्हा समन्वय समितीची बैठक घ्यायची आणि निर्णय जाहीर करायचे, असे महसूलमंत्री थोरात म्हणाले.केंद्राच्या भूमिकेनुसार पावले उचलणारदेशपातळीवर १७ मेपर्यंत लॉकडाउन आहे. त्यानंतर केंद्र सरकार कोणती भूमिका घेते, त्यानुसार महाराष्ट्रात कोणती पावले उचलायची यावर निर्णय घ्यावा, असे बैठकीत ठरले. केंद्र सरकारने रेड झोन ठरवताना जिल्हा म्हणून विचार केला आहे. मात्र, कंटेनमेंट एरियानुसार कोणता झोन कुठे ठेवायचा व कोणत्या ठिकाणी ग्रीन, आॅरेंज झोन करायचे, याचा निर्णय राज्याने घ्यावा यासाठी केंद्र सरकारला कळविण्याचे या बैठकीत ठरले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबई