शहरं
Join us  
Trending Stories
1
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?
2
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
3
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
4
ना तेंडुलकर, ना जयसूर्या! वसीम अक्रमने सांगितला ९० च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज
5
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन
6
"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट
7
Ashok Gehlot : राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
8
"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर Hardik Pandya भावूक, दिली प्रामाणिक कबुली
9
माधुरीचा साधेपणा! 'साजन'मधील ड्रेस परिधान करुन पोहोचली पुरस्कार सोहळ्याला; 33 वर्ष जुना video viral
10
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
11
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
12
वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
13
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान
14
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
15
'धारावी मॉडेल मी यशस्वी केलं, एसीमध्ये बसलेल्यांनी बोलू नये'; राहुल शेवाळेंची ठाकरेंवर टीका
16
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना शुभदायी, लाभाच्या संधी; थकीत येणी मिळतील, सौभाग्याचा काळ!
17
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
18
"बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण...", वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले?
19
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
20
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!

CoronaVirus Lockdown News: व्यापाऱ्यांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2021 1:20 AM

.... अन्यथा शुक्रवारपासून व्यापार सुरू

मुंबई : राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ मोहिमेअंतर्गत लागू केलेल्या कडक निर्बंधांमुळे व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. राज्यातील व्यापार उद्योग जगताची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे व्यापारी संघटनांच्या प्रमुखांची मंगळवारी ऑनलाईन बैठक झाली. त्यात याचा निषेध करुन फेरविचार करण्यासाठी राज्य सरकारला दोन दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. तसेच काही झाले तरी येत्या शुक्रवारपासून दैनंदिन व्यापार, व्यवहार सुरळीत ठेवण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऑनलाईन बैठकीत, वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी, महाराष्ट्र चेंबरच्या ट्रस्ट बोर्डचे चेअरमन आशिष पेडणेकर, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख राजेंद्र बाठीया, ‘केमीट’चे चेअरमन मोहन गुरनानी, यांच्यासह कोल्हापूर, पुणे, नाशिक, मुंबई, औरंगाबाद, मराठवाडा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, जळगाव, धुळे, सोलापूर, परभणी आदी जिल्ह्यांतील व्यापारी संघाचे प्रमुख सहभागी झाले होते.राज्यभरातील व्यापारी संघांच्या प्रमुखांनी ‘विकएण्ड लॉकडाऊन’च्या नावाखाली ‘पूर्ण लॉकडाऊन’ करण्याचा घाट सरकारने घातल्याचा आरोप करून त्याचा तीव्र शब्दांत निषेध करून कोणत्याही परिस्थितीत व्यापारी सहभागी होणार नाहीत, अशा भावना व्यक्त केल्या. सर्व व्यापारी संघटनांच्या वतीने महाराष्ट्र चेंबरने राज्य शासनाशी चर्चा करावी व हा आदेश तत्काळ दुरुस्त करून घ्यावा व व्यापार सुरळीत सुरू करण्यास सहकार्य करावे, अशी मागणी एकमुखाने केली.राज्य शासनाला ठरावाची प्रत  सर्व सूचनांचा विचार करून, यासंबंधी राज्य शासनाला दोन दिवसांचा वेळ देण्याचा निर्णय महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे घेण्यात आला. राज्य शासनाला यासंदर्भातल्या ठरावाची प्रत पाठवून गुरुवारी सायंकाळी सहापर्यंत सरकारकडून अपेक्षित निर्णय न झाल्यास, शुक्रवारपासून राज्यभरातील सर्व व्यापारी कोरोना प्रतिबंधाच्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करून आपापले व्यवसाय सुरू करतील, असा इशाराही सरकारला देण्यात आला.उपस्थित सर्व प्रतिनिधींच्या सूचनांचे एकत्रीकरण करून त्याचा आढावा ललित गांधी यांनी घेतला. राज्यभरातल्या व्यापारी संघाने दिलेली ही जबाबदारी महाराष्ट्र चेंबर समर्थपणे पार पडेल, अशी ग्वाही सर्वांना दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस