शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Live updates: कोरोनाचे ‘राज्य’! ब्राझीलमधील व्हेरिएंटही महाराष्ट्रात आढळला; मुख्यमंत्र्यांनी दिले लॉकडाऊनचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 03:18 IST

जिनोम सिक्वेन्सिंग व महाराष्ट्रातील नमुने यांच्या विश्लेषणातून कोरोना विषाणूत म्युटेशन झाल्याचे आढळले आहे.

मुंबई/नवी दिल्ली : देशासह राज्यात झपाट्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्र पुन्हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनण्याच्या मार्गावर असून देशात सर्वाधिक सक्रिय रुग्णांच्या आकडेवारीत टॉप दहा जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यात ३१,८५५ नवे कोरोना रुग्ण आढळले असून, त्यात मुंबईतील ५,१८५ बाधितांचा समावेश आहे. राज्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत देशभरात ४७ हजार २६२ लोकांना कोरोनाची बाधा झाली तर २७५ जणांचा मृत्यू झाला. ठाणे, पालघर, रायगडसह मुंबई महानगरात ९,१४७ रूग्ण आढळले. एकाच दिवसात एवढे रुग्ण आढळण्याचा हा नवीन वर्षातील नवा उच्चांक आहे. सलग १४व्या दिवशी बाधितांच्या संख्या वाढली आहे. 

देशात नव्या व्हेरिएंटचे ७७१ बाधितजिनोम सिक्वेन्सिंग व महाराष्ट्रातील नमुने यांच्या विश्लेषणातून कोरोना विषाणूत म्युटेशन झाल्याचे आढळले आहे. सुरुवातीच्या व्हेरिएंट्सपेक्षा हा म्युटेशन झालेला विषाणू वेगळा आहे. देशात कोरोना व्हेरिएंटच्या ७७१ प्रकरणांचा तपास लागला आहे. त्यात ब्रिटनच्या नव्या व्हेरिएंटचे ७३६ बाधित, द. आफ्रिकेच्या व्हेरिएंटचे ३४ आणि ब्राझील व्हेरिएंटचा १ अशा बाधितांचा समावेश आहे.

नांदेड, बीड जिल्ह्यात लॉकडाऊननांदेड जिल्ह्यात २५ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत कडक लॉकडाऊन. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार या काळात बंद. किराणा दुकाने दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी. बीड जिल्ह्यात २५ मार्चच्या मध्यरात्री १२ वाजेपासून ४ एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊन. केवळ शासकीय कार्यालये व अत्यावश्यक सेवा सुरू. बाहेरच्या जिल्ह्यात जाण्यास वा येण्यास कोरोना टेस्ट बंधनकारक.

परभणीत संपूर्ण संचारबंदीजिल्ह्यात बुधवारी सायंकाळीपासून १ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी.. अत्यावश्यक सेवांना यातून वगळण्यात आले आहे. या काळात इतर सर्व व्यवहारांवर निर्बंध असतील.

मुख्यमंत्र्यांनी दिले लॉकडाऊनचे संकेतराज्यात सगळीकडे कडक लॉकडाऊन लावण्याबाबतही मंत्रिमंडळात चर्चा झाली. कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने आता लॉकडाऊनशिवाय पर्याय नसेल या शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचे स्पष्ट संकेत दिले.

विषाणूच्या स्वरूपात बदल होणे ही एक सर्वसामान्य बाब आहे. कोरोनाला अटकाव करायचा असेल तर मास्कचा वापर करणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करणे हे अत्यावश्यक आहे. मास्कचा वापर लसीकरणाएवढाच प्रभावी आहे. - व्ही. के. पॉल, नीती आयोगाचे सदस्य 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUddhav Thackerayउद्धव ठाकरे