शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: राज्याच्या ग्रामीण-निमशहरी भागात संसर्ग अत्यल्प; मात्र प्रतिकारशक्ती कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 06:53 IST

२४०० नागरिकांचे सर्वेक्षण : बीड, परभणी, नांदेड, सांगली, अहमदनगर, जळगाव जिल्ह्यांचा समावेश

पुणे : पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेने (एनआयव्ही) विकसित केलेल्या ‘इलायझा’ चाचणी किटद्वारे राज्यातील सहा जिल्ह्यांतील सुमारे २४०० जणांच्या केलेल्या तपासणीत केवळ एक टक्का लोकांमध्ये कोरोनाच्या अँटीबॉडी तयार झाल्याचे आढळून आले आहे. त्यामध्ये बीड, परभणी, नांदेड, सांगली, अहमदनगर व जळगाव या जिल्ह्यांचा समावेश होता. या सर्वेक्षणावरून राज्यातील ग्रामीण तसेच निमशहरी भागांत कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण अत्यल्प असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. तसेच अद्याप लोकांमध्ये कोरोनाशी लढण्याची प्रतिकारशक्ती निर्माण झाली नसल्याचेही यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.मानवी शरीरातील रक्तात तयार झालेल्या अँटीबॉडीजचा शोध घेण्यासाठी ‘एनआयव्ही’कडून ‘इलायझा’ हे चाचणी किट मागील महिन्यात विकसित केले आहे. कोरोनाच्या अनुषंगाने शरीरात अँटीबाडीज तयार होणे म्हणजे विषाणूशी लढण्याची प्रतिकारशक्ती वाढलेली असते. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) ‘इलायझा’ किटचा वापर करून अँटीबॉडीजचा शोध घेण्यासाठी संपूर्ण देशभरात सर्वेक्षण करण्यात आले. मे महिन्यातील अखेरच्या आठवड्यापासून देशभरातील २१ राज्यांतील ६९ जिल्ह्यांची निवड करण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर, बीड, जळगाव,परभणी, नांदेड आणि सांगली या सहा जिल्ह्यांचा समावेश होता. प्रत्येक जिल्ह्यामध्ये रॅन्डम पद्धतीने विविध ठिकाणांनुसार १० समूहांची निवड करण्यात आली. प्रत्येक समूहामध्ये ४० जणांची अशी प्रत्येक जिल्ह्यात सुमारे ४०० लोकांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली.सर्वेक्षणाचा उद्देशकोरोनाचा संसर्ग झालेले परंतु लक्षणे नसलेले ७५ ते ८० टक्के रुग्ण आहेत. त्यांची कोरोना चाचणी केल्याशिवाय या व्यक्ती समोर येत नाहीत. याअनुषंगाने शरीरातील अँटीबॉडीजचा शोध घेऊन सर्वसामान्य नागरिकांमध्ये कोरोनाचा प्रसार कितपत झाला आहे, संसर्ग झाला असेल तर अँटीबॉडीज विकसित झाल्या आहेत का, प्रतिकारशक्ती वाढली आहे का, याचा अभ्यास करणे हा या सर्वेक्षणाचा उद्देश होता.सर्वेक्षणाचा निष्कर्ष : राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये एकूण २३८५ जणांच्या रक्तांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये केवळ २७ लोकांना कोरोनाचा संसर्ग होऊन गेल्याचे आढळून आले. हे प्रमाण केवळ १.१३ टक्के एवढे आहे. त्यांच्यामध्ये कोरोनाच्या अँडीबॉडीज तयार झाल्या होत्या. यावरून राज्याच्या ग्रामीण तसेच निमशहरी भागात कोरोनाचा विषाणूचा प्रसार अत्यल्प प्रमाणात झालेला दिसून येते. याचा अर्थ संसर्ग कमी प्रमाणात झाला असल्याने लोकांमध्ये अद्याप कोरोनाशी लढण्याची प्रतिकारशक्ती निर्माण झालेली नाही.पुणे-मुंबईतही सर्वेक्षणअँटीबॉडीचा शोध घेणारे हे सर्वेक्षण पुण्यासह मुंबई, ठाणे या शहरांमध्येही सुरू आहे.या शहरांमधील विविध भागांतील व्यक्तींच्या रक्ताचे नमुने तपासले जात आहेत.त्यांच्यामध्ये कोरोनाच्या अँटीबॉडी तयार झाल्या आहे किंवा नाही, तसेच किती प्रमाणावर कोरोनाचा प्रसार झाला आहे, हे समजणार आहे.राज्यात या तीन शहरांमध्येच कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत.रक्तामध्ये अँटीबॉडी तयार झाली असेल तर संबंधित व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग होऊन गेला आहे, असे आपण म्हणतो. त्याअनुषंगाने हे सर्वेक्षण करण्यात आले. अँटीबॉडी तयार झाल्याचे प्रमाण अत्यल्प आहे, याचा अर्थ लॉकडाऊनमुळे कोरोनाचा प्रसार झालेला दिसत नाही. पण त्याच वेळी प्रतिकारशक्तीही वाढलेली नाही, हे स्पष्ट होते. त्यामुळे पुढील काळात प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या लागणार आहेत.- डॉ. प्रदीप आपटे, राज्य सर्वेक्षण अधिकारी, आरोग्य विभाग

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या