शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : राज्यभर संचारबंदी लागू;जिल्ह्यांच्या सीमाही सील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 05:50 IST

coronavirus : कोरोनामुळे चीन, इटली, इराण अमेरिका आदी देशांत मृतांची संख्या मोठी असूनही सूचना लोक ऐकत नसल्यामुळेच राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवाहन करूनही लोक घराबाहेर पडत आल्याने आणि सरकारच्या सूचनांकडे पुरेसे लक्ष देत नसल्याने आता ३१ मार्चपर्यंत संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासही बंदी घालण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी ही घोषणा केली.कोरोनामुळे चीन, इटली, इराण अमेरिका आदी देशांत मृतांची संख्या मोठी असूनही सूचना लोक ऐकत नसल्यामुळेच राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. सोमवारी मुंबईसह अनेक ठिकाणी रस्ते, दुकाने आदी ठिकाणी गर्दी होती. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढू शकतो, याचाही लोक विचार करताना दिसत नव्हते.मुख्यमंत्र्यांच्या या आदेशानंतर मुख्य सचिव अजोय मेहता यांनी संचारबंदीचे आदेश काढा, असे जिल्हाधिकाऱ्यांना कळविले. हे आदेश तत्काळ अंमलात आले आहेत. त्यामुळे राज्यात संपूर्ण लॉक डाऊन आहे. संचारबंदीच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवानाच मुभा असेल.गर्दी करायची नाही म्हणजे नाहीच, याचा पुनरुच्चार करून मुख्यमंत्री म्हणाले की, अत्यावश्यक सेवेमध्येच खासगी वाहने उतरतील. टॅक्सीमध्ये चालक अधिक दोन व्यक्ती तसेच रिक्षांमध्ये चालक अधिक एक व्यक्ती अशी परवानगी तेही फक्त अत्यावश्यक सेवेसाठी देण्यात येईल.आदेशातील ठळक मुद्दे- खासगी वाहनांमध्ये चालकाव्यतिरिक्त केवळ एकाच व्यक्तीला बसता येईल आणि तेही ही अत्यावश्यक सेवेसाठी.- एसटी बसेस, मेट्रो रेल्वेही बंद राहणार आहे.- खासगी व सरकारी आंतरराज्य बससेवा बंद- सर्व दुकाने (व्यावसायिक आस्थापनेसह) कार्यालये, कारखाने, कार्यशाळा,गोदामे आदी बंद.- डाळ व धान (भात) प्रक्रिया अन्न उत्पादनांचे कारखाने, डेअरी, जनावरांसाठीचे खाद्यान्न कारखाने सुरू- बँका, एटीएम, विमा कंपन्यांची कार्यालये, गुगल पे सारख्या वित्तीय सेवा, टेलिकॉम, पोस्ट, इंटरनेट आणि डेटा सर्विसेस सुरू.- अत्यावश्यक सेवांच्या पुरवठा साखळ्या आणि त्यांची वाहतूक व्यवस्था सुरू राहील.- दवाखाने औषधांची दुकाने चष्म्याची दुकाने सुरू.- हॉटेलमध्ये बसून खाऊ शकणार नाही पण पार्सल घरी आणू शकता.- पेट्रोल पंप, एलपीजी गॅस, आॅईल एजन्सी सुरू- पुढील आदेशापर्यंत सर्व धर्मांची प्रार्थनास्थळे बंद.- शासकीय व खासगी इस्पितळांमध्ये अत्यावश्यक शस्त्रक्रिया वगळता सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्र