शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : बाप्पा पावला! 'या' जिल्ह्यात पहिले दोन रुग्ण झाले कोरोनामुक्त; टाळ्यांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात डिस्चार्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 16:53 IST

या दोघांनाही सरनोबतवाडी येथील अथायू रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.

कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये पुण्याहून आलेला पहिला कोरोना रुग्ण आणि त्याच्यामुळे संसर्ग झालेली त्याची बहीण अशा दोघांचेही कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने ते कोरोनामुक्त झाले. अशा दोघांना आज येथील अथायू रुग्णालयातून टाळ्यांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात आणि तुळशीचे रोप देऊन घरी सोडण्यात आले.कोल्हापुरातील भक्तिपूजानगरमध्ये पुण्याहून आलेल्या तरुणाला 26 मार्च रोजी कोरोना झाल्याचे अहवालात निष्पन्न झाले होते. त्यानंतर दोन दिवसांनी त्याच्या बहिणीचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या दोघांनाही सरनोबतवाडी येथील अथायू रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. या ठिकाणी अथायू रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सतीश पुराणिक, नर्सिंगच्या अधीक्षक शीतल राणे, उप व्यवस्थापक राहुल खोत, कॅज्युलिटी इन्चार्ज विजय महापुरे हे या दोघांवर उपचार करत होते. आवश्यक ती रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी औषधे, काही पूरक जीवनसत्त्वे, जोडीला समुपदेशन आणि आयुर्वेदिकतेचीही पद्धती या 23 दिवसांत उपचारात वापरण्यात आल्याची माहिती डॉ. पुराणिक यांनी दिली. मुख्य रुग्णालयापासून बाजूला असणाऱ्या इमारतीत कोव्हिड -19चा विलगीकरण कक्ष करण्यात आलेला होता. यामध्ये जीवनरक्षक यंत्रणेसह सर्व आपत्कालीन सुविधा तैनात ठेवण्यात आली होती. 14 दिवसांनंतर या दोघांचेही दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने ते कोरोनामुक्त झाले. आज कोव्हिड-19 या विलगीकरण कक्षापासून दोन्ही बाजूला रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. दोन्ही बाजूला फुगे लावण्यात आले होते. रुग्णालयातील अधिकारी-कर्मचारी यांनी टाळ्यांच्या गजरात या दोघांना निरोप दिला. रुग्णालयाच्या लॉबीत असणाऱ्या श्रीगणेशाची त्या दोघांनी आरती करून दर्शन घेतले. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर  फुगे फोडून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी आणि पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी या दोघांनाही तुळशीचे रोप आणि मिठाई देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा आरोग्‍य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी पाटील, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील, रुग्णालयाचे अध्यक्ष अनंत सरनाईक उपस्थित होते.जिल्हा प्रशासनाकडून अथायू रुग्णालयाचे आभार- डॉ. कलशेट्टीजिल्ह्यामध्ये सापडलेल्या पहिल्या कोरोनाबाधित आणि त्याच्यामुळे संसर्ग झालेल्या अशा दोन्ही रुग्णांवर अथायू रुग्णालयाने गेल्या 23 दिवसांत अतिशय चांगल्या पद्धतीने उपचार केले. जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग यांच्या बरोबरीने अथायू रुग्णालयाने कोरोना विरुद्धच्या या लढाईत सहभाग घेतला, असे सांगून महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी या रुग्णालयाच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आभार मानले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या