शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला कोरोनाची लागण; पत्नीचा रिपोर्टही पॉझिटिव्ह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 06:55 IST

कर्जतच्या माजी आमदारांना कोरोना, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

कर्जत : कर्जत बोरवाडी येथील उत्तरकार्यामध्ये सहभागी झालेल्या माजी आमदार सुरेश लाड यांची त्यांच्या अन्य नातेवाइकांच्यासह कोरोना टेस्ट करण्यात आली होती.

२९ जून रोजी त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. याबाबतची माहिती माजी आमदार सुरेश लाड यांनी एक प्रसिद्धीपत्रक सोशल मीडियावर जाहीर केले. त्यात आपण स्वत: कोरोना पॉझिटिव्ह असून, पुढील १४ दिवस आपणास कोणी भेटायला येऊ नये. काही तातडीचे काम असल्यास फोनवर मेसेज द्यावा, अशी सूचना त्यांनी केली आहे.

माजी आ.सुरेश लाड यांनी प्रसिद्धीपत्रकातआपल्या दोन्ही मुलांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, आम्ही पती-पत्नी ठणठणीत आहोेत, असे नमूद केले आहे. किरवली ग्रामपंचायतीमधील बोरवाडी येथील जैतुशेठ बडेकर हे कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांचे सासरे होते. बडेकर यांचे ८ जून रोजी निधन झाल्यानंतर त्यांचे उत्तरकार्य १८ जून रोजी होते. त्या उत्तरकार्यात सहभागी त्यांच्या कुटुंबातील एका ६१ वर्षीय महिलेचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर, तेथे उपस्थित असलेल्या २७ जणांना या महिलेल्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागण झाली.माजी आमदार सुरेश लाड यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली होती. २६ जून रोजी लाड यांची कोरोना टेस्ट घेण्यात आली आणि २८ जून रोजी त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. २९ जून रोजी सुरेश लाड यांना कर्जत आरोग्य विभाग आणि उपजिल्हा रुग्णालय यांनी क्वारंटाईन केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस