शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: नियोकोवला घाबरू नका : टास्क फोर्सचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 12:47 IST

Coronavirus: आता मुंबईतही नियोकोव या नवीन विषाणूबाबत मंथन सुरू झाले आहे. टास्क फोर्सने मुंबईकरांना वेगाने पसरणाऱ्या या विषाणूबाबत काळजी न करण्याचे आवाहन केले आहे.

मुंबई : आता मुंबईतही नियोकोव या नवीन विषाणूबाबत मंथन सुरू झाले आहे. टास्क फोर्सने मुंबईकरांना वेगाने पसरणाऱ्या या विषाणूबाबत काळजी न करण्याचे आवाहन केले आहे. टास्क फोर्सच्या म्हणण्यानुसार, सध्या प्रत्येकाने आपले लक्ष कोविडवर केंद्रित केले पाहिजे आणि नियोकोवबद्दल काळजी करू नये. नियोकोव हा व्हेरियंट कोरोनापेक्षाही धोकादायक असल्याचे बोलले जात आहे. टास्क फोर्सने स्पष्ट केले आहे की, आतापर्यंत या विषाणूचा मानवी शरीरावर परिणाम झाल्याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. चीनमधील संशोधकांना नियोकोव या नवीन विषाणूचा शोध लागला आहे. संशोधकांच्या मते हा विषाणू दक्षिण आफ्रिकेतील वटवाघळांमध्ये आढळला आहे. हा विषाणू फक्त प्राण्यांमध्ये पसरला होता. संशोधकांच्या मते, विषाणू मानवी पेशींमध्ये घुसण्यासाठी फक्त एक उत्परिवर्तन आवश्यक आहे. कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले , सद्यस्थितीत विषाणूच्या उत्पत्तीबाबत परिस्थिती स्पष्ट नाही. हा विषाणू मानवी शरीरात असल्याचा कोणताही पुरावा आतापर्यंत सापडला नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस