शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
5
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
6
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
7
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
8
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
9
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
10
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
11
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
12
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
13
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
14
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
15
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
16
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
17
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
18
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
19
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
20
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला

CoronaVirus News: केंद्राकडून महाराष्ट्राला काय काय मिळालं?; फडणवीसांनी भलीमोठी यादीच वाचून दाखवली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 5:01 PM

केंद्र सरकारकडून राज्याला मिळालेल्या मदतीचा तपशील देता फडणवीस यांचं राज्य सरकारला प्रत्युत्तर

मुंबई: कोरोना संकट काळात केंद्राकडून महाराष्ट्राला पुरेशी मदत मिळत नसल्याचे आरोप महाविकास आघाडी सरकारकडून वारंवार करण्यात येत आहेत. मोदी सरकारनं राज्याच्या वाट्याचा वस्तू आणि सेवा कर थकवल्याचा मुद्दाही राज्य सरकारनं अनेकदा उपस्थित केला आहे. राज्य सरकारच्या या आरोपांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारीसह उत्तर दिलं. 'कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारनं २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं. केंद्राकडून विविध मार्गांनी राज्याला मदत मिळाली. पण केंद्र सरकार मदतच करत नसल्याचा, महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जातो. एकच आरोप वारंवार केल्यानंतर तो खरा वाटू लागतो. मात्र केंद्राकडून इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला जास्तच मिळालं आहे,' असं फडणवीस म्हणाले.'गरिब कल्याण पॅकेजच्या अंतर्गत गरिबांना अन्नधान्य देण्याचा निर्णय झाला. गहू, तांदूळ, डाळ केंद्राकडून देण्यात आली. स्थलांतरित मजुरांनादेखील केंद्राकडून अन्नधान्य देण्यात आलं. यावर एकूण ४ हजार ५९२ कोटी रुपयांचा खर्च झाला. पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून १ हजार ७२६ कोटी देण्यात आले. जनधन योजनेच्या अंतर्गत महिलांच्या खात्यात १ हजार ३०८ कोटी जमा झाले असून ६५० कोटी रुपये लवकरच जमा होतील. उज्ज्वला योजनेतून ७३ लाख १६ हजार सिलिंडर देण्यात आले असून त्यावर १ हजार ६२५ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. विधवा, परित्यक्त्या, ज्येष्ठ नागरिक, अपंग यांच्या खात्यात ११६ कोटी रुपये जमा झाले आहेत,' अशी आकडेवारी फडणवीस यांनी दिली. लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांनाही सरकारनं भरीव मदत केल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. 'आतापर्यंत राज्यातून ६०० श्रमिक विशेष रेल्वे गाड्या सुटल्या आहेत. प्रत्येक रेल्वे गाडीवर केंद्रानं जवळपास ५० लाख रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे श्रमिक रेल्वे गाड्यांवर ३०० कोटींचा खर्च झाला  आहे. मजुरांच्या छावण्या, त्यांचं अन्नधान्य यासाठी केंद्रानंच एसडीआरएफच्या माध्यमातून १ हजार ६११ कोटी रुपये दिले. केंद्राकडून राज्याला १० लाख पीपीई किट्स आणि १६ लाख एन ९५ मास्क देण्यात आले. याशिवाय इतर वैद्यकीय साहित्य खरेदीसाठी ४४८ कोटी दिले गेले,' अशी माहिती फडणवीस यांनी दिली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी