शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

coronavirus : संचारबंदी मोडली, राज्यातील विविध भागात भाजीपाला खरेदीसाठी लोकांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 10:36 IST

जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीला संचारबंदीतून सवलत देण्यात आली आहे. या सवलतीचा फायदा घेत आज सकाळी अनेकांनी खरेदीसाठी बाजारात  गर्दी केली

ठाणे - सार्वजनिक ठिकाणी लोकांची गर्दी होऊन कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून राज्य सरकारने संचारबंदी लागू केली आहे. मात्र जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीला संचारबंदीतून सवलत देण्यात आली आहे. या सवलतीचा फायदा घेत आज सकाळी अनेकांनी खरेदीसाठी बाजारात  गर्दी केली आहे. ठाणे, अहमदनगर, नवी मुंबई येथे खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. तर गोव्यातही मासेखरेदीसाठी खवय्यांनी गर्दी केली होती. ठाण्याची मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जांभळी मार्केट मध्ये सकाळपासून ठाणेकरांनी गर्दी करून संचार बंदीचा भंग केला. ही गर्दी पाहता पोलिसांनी विक्रेत्यांना सकाळी 10 वाजेपर्यंत भाजी विकण्याची सूचना केली आहे. जर ग्राहक मास्क न घालता भाजी खरेदीला आहे त्यांना पोलिसांनी फटकावले आहे. तसेच जे ग्राहक मास्क न घालता भाजी खरेदीला येतील त्यांना विक्रेत्यांनी भाजीच विकू नये अशा सक्त सूचना ठाणे नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर. सोमवंशी यांनी सांगितले. लोकांना वाटत भाजी मिळणार नाही या भीतीने त्यांनी मार्केट मध्ये गर्दी केली आहे. परंतु वाशी मार्केट बंद झाल्यावर हे मार्केट देखील बंद ठेवले जाणार असे सोमवंशी म्हणाले. कोरोना संदर्भात पुरेशी काळजी न घेणाऱ्या ग्राहकांना सकाळीच पोलिसांचे दंडुके खावे लागले.

आज सकाळपासूनच नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापारी, विक्रेते आणि ग्राहकांची गर्दी दिसून आली. व्यापाऱ्यांसोबत सर्वसामान्य ग्राहकांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.तिकडे गोव्यामध्ये आज मासेखरेदीसाठी खवय्यांनी गर्दी केल्याचे दिसून आले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे