शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: राज्यात कोरोनाचा वाढला प्रकोप; एकट्या मुंबईत तीन हजारहून अधिक रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 06:41 IST

मुंबईतील रुग्णांची संख्या ३ हजार ३२ वर पोहोचली असून बळींचा आकडा १३९ वर गेला आहे

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रकोप दिवसागणिक वाढत आहे. राज्यात सोमवारी ४६६ नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले असून आता रुग्णसंख्या ४ हजार ६६६ वर पोहोचली आहे. तर सोमवारी नऊ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यात सात मुंबईतील व दोन मालेगावमधील आहेत. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा २३२ वर पोहोचला आहे. तर मुंबईतही सोमवारी १८७ रुग्णांचे निदान झाले. मुंबईची संख्या ३ हजार ३२ वर पोहोचली आहे. तर मुंबईत बळींचा आकडा १३९ झाला. पुण्यात ५९ नव्या रूग्णांची नोंद झाल्याने एकूण संख्या ७५६ वर पोहोचली आहे.सोमवारी राज्यात झालेल्या मृत्यूंपैकी सहा पुरुष तर तीन महिला आहेत. या मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील पाच रुग्ण आहेत. तर एक रुग्ण ४० ते ६० वयोगटातील व एक रुग्ण ४० वर्षांखालील आहे. मालेगाव येथील मृत्युमुखींपैकी दोन रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत. उर्वरित सात जणांपैकी पाच रुग्णांमध्ये ७१ टक्के मधुमेह, उच्च रक्तदाब आदी आजार होते.७१,६११ जणांचे नमुने निगेटिव्हआजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७६ हजार ९२ नमुन्यांपैकी ७१ हजार ६११ प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. राज्यात सोमवारी ६५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर आजपर्यंत राज्यातील ५७२ रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. सध्या राज्यात ९३ हजार ६५५ लोक घरगुती अलगीकरणात असून ६ हजार ८७९ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.राज्यातील २ हजार ३३६ रुग्णांचे विश्लेषण केले असता त्यापैकी १ हजार ८९० म्हणजेच ८१ टक्के रुग्ण लक्षणविरहित आहेत. तर १७ टक्के म्हणजे ३९३ रुग्णांना लक्षणे असल्याचे दिसून आले आहे. या रुग्णांपैकी ५३ रुग्ण म्हणजेच दोन टक्के हे आयसीयूमध्ये आहेत.पाहणीसाठी येणार केंद्राचे पथक : मुंबई-पुण्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने केंद्रीय गृह मंत्रालयाने दहा सदस्यांचे पथक महाराष्ट्रात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या