शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
4
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
6
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
7
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
8
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
9
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
10
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
11
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
12
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
13
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
14
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
15
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
16
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
17
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
18
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
19
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर

Coronavirus: संकटकाळात ८८ लाख महिला, बालकांची दोन महिने सोय; महिला व बालविकास विभागाचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 02:52 IST

अंगणवाड्यांमधील बालकांना या वस्तूंव्यतिरिक्त तांदूळदेखील दिला जात आहे.

यदु जोशी

मुंबई : राज्यातील तब्बल ८८ लाख शहरी आणि ग्रामीण मुले व गर्भवती तसेच स्तनदा मातांना दोन महिने पुरेल इतक्या खाण्यासाठीच्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करीत महिला व बालविकास विभागाने कोरोनाच्या संकटकाळात धावून जाण्याचे काम केले आहे.सहा महिने ते तीन वर्षांपर्यंतची बालके, गर्भवती व स्तनदा माता तसेच अतिकुपोषित बालके अशा ५० लाख, तर अंगणवाड्यांमधील तीन वर्षे ते सहा वर्षे वयाच्या ३८ लाख बालकांना हा पुरवठा केला जात आहे. त्यात हरभरा डाळ, तेल, हळद, मिरची, मीठ आणि गहू यांचा समावेश आहे.

अंगणवाड्यांमधील बालकांना या वस्तूंव्यतिरिक्त तांदूळदेखील दिला जात आहे. सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील बालकांना एका जेवणात ५०० कॅलरी व १२ प्रोटीन दर किलोमागे द्यावेत, तर महिलांना ६०० कॅलरी आणि १८ ते २० प्रोटीन दर किलोमागे द्यावेत, असे निकष आहेत. दोन महिने पुरतील एवढ्या वस्तू एका किटमध्ये दिल्या जात असून पुरवठादार प्रत्येक अंगणवाडीमध्ये हे किट पोहोचवतात आणि तेथून महिला व इतर कुटुंबीयांना त्या दिल्या जातात. केंद्र व राज्य सरकारच्या निधीतून हे काम केले जाते. सूत्रांनी सांगितले की, पुरवठादारांना तब्बल ४०० कोटी रुपये अद्याप मिळालेले नाहीत. त्यात महिला बचत गटांच्या माध्यमातून काम करणाऱ्या पुरवठादारांचा समावेश आहे.

लॉकडाउनचा काळ आणि त्यातही कमी दिवस हाती असताना आमच्या यंत्रणेने प्रचंड नियोजन करून ८८ लाख माता-बालकांपर्यंत पोहोचण्याचा विडा उचलला. पुरवठा प्रक्रियेचे मॉनिटरिंग नियमित केले जात आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मी विशेष आभार मानते. - यशोमती ठाकूर, मंत्री, महिला व बालविकासपोषण आहार घरपोचसहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील बालकांना आधीपासूनच घरपोच पुरवठा केला जात होता. मात्र, आता त्यात ३ वर्षे ते ६ वर्षे वयोगटातील बालकांचाही समावेश करण्यात आला आहे. ही बालके अंगणवाड्यांमध्ये यायची आणि त्यांना शिजवलेले अन्न पुरवण्यात यायचे. मात्र, लॉकडाउनच्या काळात अंगणवाड्या बंद आहेत. त्यामुळे त्यांनाही महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत पूरक पोषण आहार थेट घरापर्यंत पोहोचविला जात आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसwomen and child developmentमहिला आणि बालविकास