शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
4
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
5
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
6
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
7
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
8
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
9
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
10
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
11
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
12
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
13
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
14
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
15
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
16
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
17
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
18
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
19
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
20
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी

CoronaVirus News: ठाकरे सरकारनं लपवली आकडेवारी?; कोरोना मृतांची संख्या अचानक १३२८ नं वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 06:50 IST

कोरोना मृत्यूची आकडेवारी लपवली जात असल्याचा आपण केलेला आरोप खरा ठरला; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

मुंबई : राज्यात कोरोनाने १५ जूनपर्यंत ४१२८ मृत्यू झालेले असताना राज्य सरकारने मंगळवारी केलेल्या स्पष्टीकरणानंतर प्रत्यक्षात आणखी १३२८ मृत्यू झाले असल्याचे समोर आले. त्यामुळे कालपर्यंत मृतांचा आकडा ५४५६ झाला आहे. त्यानंतर, कोरोना मृत्यूची आकडेवारी लपवली जात असल्याचा आपण केलेला आरोप खरा ठरला आहे, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सांगितले की, राज्य सरकारने फेरतपासणी केली असता मुंबई महापालिका क्षेत्रात आणखी ८६२ मृत्यू, तर राज्यात आणखी ४६६ मृत्यू आढळले. या सर्व प्रकरणांत मृत्युसमयी कोविड अहवाल पॉझिटीव्ह आला होता व या सर्व प्रकरणांची नोंद डेथ इन कोविड पॉझिटीव्ह म्हणून घेण्यात आली आहे.कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या नोंदी कमी संख्येने दाखविण्यात आल्याबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात येत असताना मेहता यांनी सांगितले की, जागतिक आरोग्य संघटना, आयसीएमआर तसेच नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या (एनसीडीसी) मार्गदर्शक तत्वांनुसार कोरोनाबधित मृत्यू प्रकरणांची तपासणी करणे बंधनकारक आहे, या आधारे तसेच राज्य सरकारने निर्देशित केल्याप्रमाणे मार्चपासूनची पडताळणी करण्यात आली. त्यानुसार नवीन आकडेवारी आली आहे. आकडेवारीत वाढ दिसली तरी हेतूबाबत शंका घेण्याचे कारण असू नये.फेरतपासणीमध्ये राज्यात पुढीलप्रमाणे आणखी मृत्यूसंख्या आढळली. अहमदनगर १, अकोला १४, अमरावती ६, औरंगाबाद ३३, बुलढाणा २, धुळे १२, जळगाव ३४, जालना ४, लातूर ३, नांदेड २, नाशिक २८, उस्मानाबाद ३, पालघर ११, परभणी १, पुणे ८५, रायगड १४, रत्नागिरी १, सांगली ४, सातारा ६, सिंधुदूर्ग ३, सोलापूर ५१, ठाणे १४६, वाशिम १, यवतमाळ १ अशी एकूण ४६६.अखेर सत्य पुढे आलेचकोरोना मृत्यूचा आकडा लपविला जात आहे असा आरोप आपण केला होता. सरकारने आज खरी आकडेवारी दिली; मात्र आतापर्यंत खरी आकडेवारी लपविणाऱ्यांवर काय कारवाई करणार असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून गेल्या तीन महिन्यांपासून काही कोरोनामृत्यू होऊन सुद्धा ते प्रत्यक्ष आकडेवारीत दाखविले जात नसल्याबद्दल तक्रार केली होती. आयसीएमआर आणि जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना बळी कसे नोंदवायचे, याचे स्पष्ट दिशानिर्देश दिले असल्याने ही कार्यकक्षा डेथ आॅडिट कमिटीची कशी काय होऊ शकते? ही समिती मृत्यूसंख्या कमी करण्यासाठी आहे की, मृत्यूसंख्या दडपण्यासाठी, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता.राज्यात ८१ मृत्यूराज्यात मंगळवारी ८१ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर दोन हजार ७०१ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले.दिवसभरात एक हजार ८०२ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले.राज्यात आजपर्यंत एकूण ५७ हजार ८५१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.राज्यात ५० हजार ४४ रूग्णांवर उपचार सुरू असल्याने आजवरच्या रूग्णांची एकूण संख्या एक लाख १३ हजार ४४५ वर पोहोचली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस