शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोना मृत्यूवरून फडणवीसांचे ठाकरे सरकारवर पुन्हा गंभीर आरोप; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 07:43 IST

हजारपेक्षा अधिक कोरोना मृत्यूंची नोंद शासनाच्या पोर्टलवर झालेली नाही, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी लोकमत डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत केला.

- यदु जोशीमुंबई : कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची आकडेवारी सरकारकडून लपविली जात असल्याचा आरोप आपण केल्यानंतर एका दिवसात १३५२ इतका मृतांचा आकडा वाढला; पण आजही सरकारकडून ही लपवाछपवी सुरूच आहे. हजारपेक्षा अधिक कोरोना मृत्यूंची नोंद शासनाच्या पोर्टलवर झालेली नाही, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी लोकमत डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत केला.सरकारच्या पोर्टलवर नोंद नसलेल्या हजाराहून अधिक मृत्यूंव्यतिरिक्त अनेकांचा मृत्यू इस्पितळात नेण्यापूर्वीच झाला, स्वॅब घेतलेला नव्हता. त्यामुळे ते कोरोनाने दगावले याचे पुरावेही राहिलेले नाहीत. आकडेवारी कशी लपवली जात आहे याचा उलगडा आपण लवकरच करू, असे फडणवीस म्हणाले.कोरोनावरील उपचारासाठी राज्य शासन व महापालिकांनी अंदाधुंद खरेदी केली. १२०० ते दोन हजार रुपये किमतीच्या बॉडी बॅगची खरेदी ६५०० रुपयांत करण्यात आली. पीपीई किटची खरेदी अव्वाच्या सव्वा दराने झाली. हळूहळू खूप गोष्टी बाहेर येतील.कोरोनाचा मुकाबला करताना सरकारमध्ये समन्वय नाही. अशी लढाई भगवान भरोसे लढता येत नाही. उद्धवजी फेल झाले की पास झाले अशा प्रकारचे सर्टिफिकेट द्यायला मी बसलेलो नाही. ही निर्णय घेण्याची वेळ आहे, टाळण्याची नाही. अशा वेळी मुख्यमंत्र्यांनी निर्णयक्षम व्हायला हवे. निर्णय स्वत: घ्यावे लागतात. नोकरशाही निर्णय घेते अशी सध्याची चर्चा आहे.परीक्षांचा घोळ संपवाविद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचा घोळ हा राज्य सरकारची अनिर्णीत राहण्याची स्थिती आणि अनेक पॉवर सेंटर यामुळे निर्माण झाला. परीक्षांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही, राज्यपालांना आहे असे मत राज्याच्या विधी व न्याय विभागाने दिले असल्याची माझी माहिती आहे. भविष्यामध्ये विद्यार्थ्यांच्या हिताचे काय हे सरकारने ठरवायला हवे. अमुकच निर्णय घ्या असे आमचे म्हणणे नाही परंतू एटीकेटीच्या विद्यार्थ्यांसह सर्वांबाबत तत्काळ निर्णय घ्या एवढाच आमचा आग्रह आहे.इतकी लाचारी मी बघितली नाहीमी पहिले असे सरकार पाहिले की विरोधकांनी त्यांचे गोडवे गावेत असे त्यांना वाटते. तसे काम केले तर तेही करू. सरकारचे अपयश दिसत असताना टीका करणारच. सरकार अस्थिर करण्यात रस नाही, ते आपसातील संघर्षातूनच पडेल. शंभर वर्षे जुन्या पक्षाला कुरकुरणारी खाट म्हटल्यानंतर त्या पक्षाचे प्रमुख म्हणतात, आम्ही कुरकुरणारी खाट असू, पण काय म्हणायचेय ते समजून घ्या. इतकी लाचारी मी बघितली नाही. लाचारीचे सरकार फार काळ टिकत नसते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस