शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

CoronaVirus News: सहकारी संस्थांच्या निवडणुका आणखी तीन महिने लांबणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 06:50 IST

१८ सप्टेंबरपर्यंत पुढे; राज्यात दोन लाख सहकारी संस्था

मुंबई : कोरोनाचा संकटकाळ असल्याने राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका तीन महिन्यासाठी म्हणजे १८ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली.यादी सहकार विभागाने १८ मार्च रोजी एक आदेश काढून तीन महिन्यासाठी या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या; ती मुदत उद्या संपत आहे. त्यामुळेआता आणखी तीन महिन्यांसाठी निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.ज्या संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश उच्च न्यायालय वा सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत त्या वगळून इतर सर्व संस्थांच्या निवडणुका आजच्या आदेशामुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. नैसर्गिक आपत्तीच्या काळात निवडणुका पुढे करण्याचे अधिकार सहकारी संस्था अधिनियमानुसार राज्य शासनाला आहेत.राज्यात एकूण २ लाख सहकारी संस्था आहेत. त्यातील निवडणुकीची प्राथमिक प्रक्रिया सुरू झालेल्या तसेच ज्यांची निवडणूक या काळात व्हावयाची आहे त्यांना ही मुदतवाढ मिळेल. २००० पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांना दरमहा १००० रुपये तर २००१ ते ८ हजारपर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांना दरमहा १५०० रुपये आणि ८००१ पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांना दरमहा २ हजार रुपये इतके मानधन देण्यात येत आहे.सरपंचांनाही मिळाले प्रलंबित मानधन; २२ कोटी जमासरपंचांचे काही महिन्यांच्या प्रलंबित मानधनापोटी त्यांच्या खात्यावर नुकतेच २२ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.उपसरपंचांनाही मिळणार मानधनराज्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचांप्रमाणे उपसरपंचांनाही मानधन सुरु करण्यात आले आहे. त्यापोटी पहिल्या टप्प्यात एकूण ८ महिन्यांचे एकत्रित मानधन (१५.७२ कोटी) जमा करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.राज्यात सुमारे २८ हजार ग्रामपंचायती असून त्यातील आॅनलाईन प्रक्रिया पूर्ण केलेल्या २४ हजार ४८५ ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांच्या खात्यावर सध्या मानधन जमा झाले आहे. उर्वरित उपसरपंचांच्या खात्यावर मानधन जमा करण्याची कार्यवाही सुरु असल्याचेही मुश्रीफ म्हणाले.