शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: चिंता कायम! राज्यात ३५ हजार ७३६ नवे रुग्ण; दैनंदिन मृत्यूंचा उच्चांक, दिवसभरात १६६ बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2021 06:53 IST

राज्यात शनिवारी १४ हजार ५२३ काेराेनाचे रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत २३ लाख १४ हजार ५७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

मुंबई : राज्यात दिवसभरात ३५ हजार ७३६ कोरोना रुग्णांचे निदान झाले असून १६६ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २६ लाख ७३ हजार ४६१ झाली असून, बळींचा आकडा ५४ हजार ७३ झाला आहे. तर, ३ लाख ३ हजार ४७५ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आऱोग्य विभागाने दिली. राज्यात पहिल्यांदाच सर्वाधिक १६६ दैनंदिन मृत्यूंची नोंद झाली. यापूर्वी, २३ मार्च रोजी १३१ मृत्यूंची नोंद झाली होती. मागील कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळापासून पहिल्यांदाच दैनंदिन मृत्यूंच्या उच्चांकाची नोंद झाली आहे. मुंबईत दिवसभरात नव्या ६ हजार १२३ बाधितांचे निदान झाले असून १२ जणांना जीव गमवावा लागला.

राज्यात शनिवारी १४ हजार ५२३ काेराेनाचे रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत २३ लाख १४ हजार ५७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील काेराेनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ८६.५८ टक्के इतके  झाले असून मृत्यूचे प्रमाण २.२ टक्के आहे. 

धक्कादायक! मुंबईत तासाला १४८ रुग्णगेल्या आठवडाभरात तासाला सरासरी १४८ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाणही आता ११ टक्‍क्‍यांपर्यंत पोहचले आहे. मंगळवारपासून मुंबईसह राज्यभरात रात्रीची संचारबंदी लागू झाली आहे. मुंबई पालिकेने चाचण्यांचे प्रमाण दुप्पट करण्याचा निर्णय घेत सरासरी २० ते २५ हजारपर्यंत होणाऱ्या चाचण्यांची संख्या ४७ हजारांच्या पुढे नेली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या