शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

CoronaVirus : सर्व उघडतो! जबाबदारी घेताय? उद्धव ठाकरेंचा विरोधकांना थेट सवाल; म्हणाले...

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: November 22, 2020 20:40 IST

ठाकरे म्हणाले, मला या विषयावर राजकारण करायचे नाही. पण, विरोधक सातत्याने म्हणत आहेत, की हे उघडा, ते उघडा, हो सर्व उघडतो!

मुंबई - कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा देशभरात हाहाकार घालायला सुरुवात केली आहे. देशातील काही बड्या शहरांमध्ये कर्फ्यूदेखील जाहीर करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आज (रविवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी, गर्दी वाढली म्हणजे कोरोनाचं संकट संपलं असं समजू नका. कोरोनापासून एक-दोन नव्हे तर चार हात दूर रहा. धोक्याच्या वळणावर सावध राहा, अशी विनंती करत त्यांनी विरोधकांनवरही जोरदार निशाणा साधला आहे.

ठाकरे म्हणाले, मला या विषयावर राजकारण करायचे नाही. पण, हे उघडा, ते उघडा, म्हणत आहेत. हो सर्व उघडतो! जबाबदारी घेताय?, असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी विरोधकांना केला. तसेच, या सरकारच्या माध्यमाने जनतेची जेवढी जबाबदारी माझ्यावर आहे. तेवढी हे उघडा, ते उघडा म्हणणाऱ्यांवर नाही, असेही ते म्हणाले. 

जनतेला आवाहन करत ठाकरे म्हणाले, कोरोनापासून स्वतःचा बचाव करा, कामाशिवाय घरातून बाहेर पडू नका. पुन्हा लॉकडाऊन लावायचा नाही. रुग्ण संख्येत वाढ झाली आणि रुग्णालये कमी पडली तर कुणीही वाचवू शकणार नाही. कोरोनामुळे अद्यापही शाळा उघडण्यासंदर्भात प्रश्नचिन्हच आहे. त्या उघडायच्या आहेत पण भीती आहे.कोरोनासंदर्भात केल्या जाणाऱ्या सूचनांसंदर्भात जनतेकडून मिळणाऱ्या सहकार्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले. "गेल्या आठ महिन्यांत अनेक सण येऊन गेले. आपले सर्वच सण गर्दीचे होते. मग त्यात गणपती असेल, दिवाळी आणि दसरा असेल. हे सर्व सण आपण अतिशय साधेपणाने साजरे केले. गर्दी टाळली. त्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा कमी झाला. मी सांगितलेल्या सर्व गोष्टी आपण ऐकता, तुमच्या या सहकार्याला तोड नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच यापुढेही सर्वांकडून अशाच प्रकारचे सहकार्य मिळत राहो," अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

या शिवाय, मास्क न लावणाऱ्यांवर त्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे. तसेच नियमांचे काटेकोर पणे पालन करा अशी विनंतीही त्यांनी यावेळी जनतेला केली. याशिवाय ज्याप्रमाणे साधेपणाने आपण सण उत्सव साजरे केले अगदी त्याच प्रमाणे कार्तिकी यात्रेलाही कृपया गर्दी करू नका, उसे उद्धव ठाकरे म्हणाले.

राज्यातील कोरोना बाधितांचा एकूण आकडा १८ लाखांच्या जवळराज्यात गेल्या २४ तासांत ५ हजार ७५३ कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण बाधितांचा आकडा १७ लाख ८० हजार २०८ वर पोहोचला. गेल्या २४ तासांत ५० जणांचा मृत्यू झाला असून ४ हजार ६० जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत १६ लाख ५१ हजार ६४ जणांनी कोरोनावर मात केली असून सध्याच्या घडीला ८१ हजार ५१२ जणांवर उपचार सुरू आहेत. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत ४६ हजार ६२३ जणांचा मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUddhav Thackerayउद्धव ठाकरे