शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: ...तर विनाअनुदानित शाळांवर दंडात्मक कारवाई, प्रसंगी मान्यता रद्द करणार, राज्यमंत्री बच्चू कडूंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 05:05 IST

CoronaVirus: आवश्यकतेनुससार, त्यांची मान्यता रद्द करण्याचा विचार केला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

सीमा महांगडे मुंबई : पूर्व प्राथमिक ते दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत राज्याच्या शिक्षण विभागाने या वर्गातील मुलांसाठी आॅनलाइन शिक्षण नको, अशा सूचना केल्या. परंतु, खासगी विनाअनुदानित शाळा त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. हा शासन निर्णय नसून केवळ मार्गदर्शक सूचना असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, ज्या शाळा किंवा शिक्षणसंस्था या सूचनांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. आवश्यकतेनुससार, त्यांची मान्यता रद्द करण्याचा विचार केला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.अनेक जिल्ह्यांतून पूर्व प्राथमिक ते दुसरीच्या विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण दिले जात असल्याच्या तक्ररी येत आहेत. पुण्यातील अशाच एका तक्रारीवर नुकतेच ते वर्ग बंद केल्याची माहिती राज्यमंत्र्यांनी दिली. या सर्वांवर नियंत्रण आणण्यासाठी लवकरच परिपत्रक काढून जिल्ह्यांना, शैक्षणिक संस्थांना देण्यात येईल. नियमांचे पालन सर्व शाळांनी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.>मनमानी खपवून घेतली जाणार नाहीशाळांनी शुल्कवाढ करू नये. सद्य:स्थितीत पालकांकडे शुल्क भरण्यासाठी तगादा लावू नये हे याआधीच शासन निर्णय व परिपत्रकांतून स्पष्ट केले आहे. शिक्षण विभागाच्या सूचनांना डावलून शाळा मनमानी करणार असतील तर त्यांना कारवाईला सामोरे जावेच लागेल, असा इशारा राज्यमंत्री कडू यांनी दिला.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडू