शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

CoronaVirus: जगाचा आकडा २५ लाखांवर; राज्यात एकूण ५,२१८ रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 06:48 IST

५५२ नवे बाधित; १९ मृत्यूंची नोंद; एकूण बळी २५१ वर

मुंबई : राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. मंगळवारी ५५२ नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाल्याने रुग्णांची संख्या ५ हजार २१८ वर पोहोचलीे. तर १९ मृत्यूंची नोंद झाल्याने एकूण बळींचा आकडा २५१ झाला. त्याचप्रमाणे, मुंबईत ३५५ रुग्णांचे निदान झाले असून एकूण रुग्णसंख्या ३ हजार ४५१ झाली आहे. तर शहर-उपनगरात १२ मृत्यूंची नोंद झाली असून मृतांचा आकडा १५१ वर पोहोचला आहे. मुंबई शहर-उपनगरात कोरोनाचे २ हजार ८८७ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आढळले आहेत. जगातही कोरोनाचा प्रकोप वाढत असून रुग्णांचा आकडा २५ लाख ३६ हजारांवर गेला आहे.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने मुंबई-पुण्यात शिथिल केलेल्या लॉकडाउनमधील सवलती पुन्हा रद्द करत अधिक काटेकोरपणे नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. १९ मृत्यूंमध्ये मुंबईतील १२, पुण्यातील तीन, ठाणे मनपामधील २, सांगलीतील १ आणि पिंपरी-चिंचवड येथील एक आहे. यात १० पुरुष तर ९ महिला आहेत. १९ मृत्यूंपैकी ६० वर्षे व त्यावरील ९ रुग्ण आहेत. ९ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. एक रुग्ण ४० वर्षांखालील आहे. १२ रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग आदी आजार आढळले आहेत.१५० जण कोरोनामुक्तमंगळवारी १५० जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ७२२ बरे झाल्याने त्यांना घरी सोडले आहे. सध्या ९९ हजार ५६९ लोक होम क्वारंटाइन असून ७ हजार ८०८ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. ८३ हजार नमुन्यांपैकी ७७ हजार ६३८ जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत.लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, वाशिममध्ये एकही रुग्ण नाहीनवी दिल्ली : महाराष्ट्रातील लातूर, उस्मानाबाद, हिंगोली आणि वाशिम या चार जिल्ह्यांमध्ये गेल्या १४ दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही, याचा विशेष उल्लेख केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. ६१ जिल्ह्यांमध्ये कोरियाचे रुग्ण आढळलेले नाहीत.६१ जिल्ह्यांत एकही नवा रुग्ण नाहीनवी दिल्ली : देशात आतापर्यंत ३,९७५ जण कोरोनातून बरे झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण १४ टक्के होते. ते आता ते १७.४८ पोहोचल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी दिली. सोमवारी ७०५ जण बरे झालेत. सध्या देशात २०,०८० रुग्ण आहेत. एकूण ६४५ मृत्यू झाले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस