शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

CoronaVirus: चिंता वाढली! दिवसभरात राज्यात ११३ नवीन रुग्णांची नोंद; एकूण रुग्ण संख्या ७४८वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2020 21:11 IST

कस्तुरबा रुग्णालयात एका ५२ वर्षीय पुरुषाचा काल रात्री मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नव्हता. त्याला उच्च रक्तदाब, मधुमेह या आजारांसोबत तो एचआयव्ही बाधितही होता. 

मुंबई -  राज्यात मागील २४ तासांत ११३  नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ७४८  झाली आहे. परिणामी, कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचे नवे आव्हान शासनासमोर उभे राहिले आहे. रविवारी राज्यभरात एकाच तीन दिवशी तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू ओढावला आहे. राज्यात एकूण ४५ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूपैकी ८ जण मुंबईतील, ३ जण पुण्याचे तर प्रत्येकी १ रुग्ण कल्याण डोंबिवली आणि औरंगाबाद  येथील आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १६००८ नमुन्यांपैकी १४८३७ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ७४८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ५६ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ४६,५८६  व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ३१२२  जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत. .....................................................

१० लाखांहून अधिक जणांचे सर्वेक्षण

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. मुंबई मनपा क्षेत्रात यासाठी ५१९ टीम काम करत आहेत तर पुणे महानगरपालिका क्षेत्रात ४३९ टीम कार्यरत आहेत. नागपूर मनपा मध्ये २१० टीम घरोघर सर्वेक्षणाचे काम करत आहेत तर नवी मुंबई मनपा क्षेत्रात १९६ नियुक्त करण्यात आलेल्या आहेत.  राज्यात या प्रकारे एकूण ३०७८ सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी १० लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.  

..........................

बळींची संख्या ४५ वर

राज्यात रविवारी एकाच दिवशी तीन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू ओढावला आहे. यामुळे राज्यातील कोरोनामुळे ओढावलेल्या मृतांचा आकडा ४५ वर जाऊन पोहोचला आहे. त्यात रविवारी झालेल्या मृत्यूंत केईएममध्ये मुंबईच्या ६० वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला, त्याला कोणत्याही प्रवासाचा इतिहास नव्हता. तर औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५८ वर्षीय बँक अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. या रुग्णाला प्रवासाचा इतिहास नव्हता. तर औंध येथे रविवारी दुपारी ७७ वर्षीय आत्यंतिक स्थूल महिलेचा मृत्यू झाला. तिची नुकतीच पित्ताशयाची शस्त्रक्रिया झाली होती.

........................................................

जिल्हा/मनपा              बाधित रुग्ण              मृत्यू

मुंबई                    ४५८                     ३०

पुणे शहर/ग्रामी      ण          १००                     ०५

सांगली                   २५                      ०

ठाणे मंडळ मनपा          ८२                      ०६

नागपूर                   १७                      ०

अहमदनगर               २१                      ०

लातूर                    ०८                      ०

औऱंगाबाद                ७                       १

बुलढाणा                  ५                       १

यवतमाळ,उस्मानाबाद       प्रत्येकी ४                ०

सातारा                   ३                       ०

कोल्हापूर,रत्नागिरी,जळगाव  प्रत्येकी ३                ०१(जळगाव)

सिंधुदुर्ग,गोंदिया,नाशिक,

वाशिम,अमरावती,हिंगोली    प्रत्येकी १                ०१(अमरावती)

अन्य राज्य               २                       ०

एकूण                    ७४८                     ४५   

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस