CoronaVirus News: राज्यात ११ लाख ३४ हजार रुग्ण कोविडमुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2020 04:04 AM2020-10-04T04:04:36+5:302020-10-04T04:05:38+5:30

CoronaVirus in Maharashtra: राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७९.३ झाले असून, मृत्युदर २.६४ टक्के

CoronaVirus 11 lakh 34 thousand patients recovered from covid in the state | CoronaVirus News: राज्यात ११ लाख ३४ हजार रुग्ण कोविडमुक्त

CoronaVirus News: राज्यात ११ लाख ३४ हजार रुग्ण कोविडमुक्त

googlenewsNext

मुंबई : राज्यात दिवसभरात कोरोनाचे १६ हजार ८३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत ११ लाख ३४ हजार ४५५ रुग्ण कोविडमुक्त झाले. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७९.३ झाले असून, मृत्युदर २.६४ टक्के आहे.

राज्यात शनिवारी १४ हजार ३४८ रुग्ण आणि २७८ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १४ लाख ३० हजार ८६१ झाली असून, बळींचा आकडा ३७ हजार ७५८ वर पोहोचला आहे.

दिवसभरात नोंदविलेल्या २७८ मृत्यूंमध्ये मुंबई ४६, ठाणे २, ठाणे मनपा १३, नवी मुंबई मनपा ५, कल्याण-डोंबिवली मनपा १०, भिवंडी-निजामपूर मनपा १, मीरा-भार्इंदर मनपा ४, पालघर ३, वसई-विरार मनपा २, रायगड २, पनवेल मनपा ६ आदी रुग्णांचा समावेश आहे. सध्या राज्यात २२ लाख ३ हजार ९६६ व्यक्ती घरगुती अलगीकरणात, तर २८ हजार ४१४ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.

मुंबईत कोरोनाचे ९ हजारांहून अधिक बळी
मुंबई : मागील सहा महिन्यांत मुंबईत कोरोनाचे तब्बल ९ हजारांहून अधिक बळी गेले. शहर-उपनगरात दिवसभरात कोरोनाच्या २ हजार ४०२ रुग्णांचे निदान झाले असून, ४६ मृत्यू झाले. परिणामी, कोरोनाबाधितांची संख्या २ लाख १२ हजार ४६२ झाली असून, मृतांचा आकडा ९ हजार ६० आहे.

आतापर्यंत मुंबईतील १ लाख ७३ हजार ६७० रुग्ण कोविडमुक्त झाले असून, सध्या २९ हजार ३१४ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर ८२ टक्क्यांवर आला असून, रुग्णदुपटीचा कालावधी ६४ दिवसांवर गेला आहे. २६ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर १.०९ टक्के नोंदविण्यात आला. तर, शुक्रवारपर्यंत ११ लाख ५७ हजार ३९ कोविडच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

सध्या मुंबईत चाळ व झोपडपट्टीत ६७४ सक्रिय कंटेनमेंट झोन्स आहेत. सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ९ हजार २८० इतकी आहे. मागील २४ तासांत पालिकेने रुग्णांच्या सहवासातील १९ हजार ९७६ अतिजोखमीच्या व्यक्तींचा शोध घेतला.

Web Title: CoronaVirus 11 lakh 34 thousand patients recovered from covid in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.