शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

coronavirus: राज्यात १०२६ नवीन बाधितांची नोंद, एकूण रुग्ण २४,४२७  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 07:03 IST

दिवसभरात राज्यात ५३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यात २९ पुरुष आणि २४ महिलांचा समावेश आहे. या ५३ मृत्यूंपैकी तब्बल २१ जणांचे वय साठ वर्षांहून अधिक होते.

मुंबई : राज्यात मंगळवारी १०२६ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने रुग्णांचा एकूण आकडा २४ हजार ४२७ इतका झाला आहे. तर, मंगळवारी दिवसभरात ३३९ तर आतापर्यंत तब्बल ५,१२५ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.दिवसभरात राज्यात ५३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यात २९ पुरुष आणि २४ महिलांचा समावेश आहे. या ५३ मृत्यूंपैकी तब्बल २१ जणांचे वय साठ वर्षांहून अधिक होते. तर २७ जण चाळीस ते साठ या वयोगटातील होते. पाच जण ४० वर्षांखालील आहेत. आज ५३ मृतांपैकी ३५ जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ९२१ इतकी झाली आहे.  मंगळवारी झालेल्या ५३ मृत्यूंपैकी मुंबईमधील २८, पुण्यात ६, पनवेलमध्ये ६, जळगावमध्ये ५, सोलापूर शहरात ३, ठाण्यात २ आणि रायगड, औरंगाबाद आणि अकोला शहरातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आतापर्यंत प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या २,२१,६४५ नमुन्यांपैकी १,९५,८०४ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत तर २४,४२७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १२८९ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १२,९२३ सर्वेक्षण पथकांनी काम केले. त्यांनी ५४.९२ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.एकट्या मुंबईत देशातील कोणत्याही राज्यापेक्षा जास्त रुग्णनवी दिल्ली : मे महिना आतापर्यंत तरी कोरोनाचा कहर वाढवणारा ठरला आहे. दररोजची रुग्णसंख्या एकदाही तीन हजारांपेक्षा कमी नोंदलेली नाही. सर्वात चिंताजनक म्हणजे देशातील कोणत्याही राज्यापेक्षा एकट्या मुंबईत १५ हजारांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आहेत. महाराष्ट्र वगळता एकाही राज्याने अद्याप पाच आकडी रुग्णसंख्या गाठलेली नाही. मुंबईतील वाढता आकडा पाहता तेथेमहामारीचा तिसरा टप्पा सुरू झाल्याची भीती आहे.अमेरिकेत बरे होण्याचे प्रमाण कमीचरुग्णवाढीचे प्रमाण अमेरिकेत अधिक असले तरी ते बरे होण्याचे प्रमाण अद्याप खूप कमी आहे. तेथील १३ लाख ८८ हजारांपैकी केवळ २ लाख ६२ हजार रुग्णच बरे झाले असून, मृतांची संख्या ८२ हजार आहे. त्या तुलनेत जर्मनी, स्पेन, तुर्कस्थान, इराण आदी देशांत आतापर्यंत ५० टक्क्यांहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबई