शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम वऱ्हाडात कोरोनाचा पहिला बळी; बुलडाण्यात मृत्यू झालेला रुग्ण ‘पॉझिटिव्ह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 17:21 IST

पश्चिम वºहाडातील हा पहिलाच बळी ठरला असून, त्यामुळे तिन्ही जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देआयसोलेशन कक्षात एका व्यक्तीचा अवघ्या तासाभरातच उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. स्वॅब नमुने ‘हार्ड अ‍ॅन्ड फास्ट’ तत्वावर नागपूर येथे पाठविण्यात आले होते. अहवाल प्राप्त झाल्यानंतर सदर रुग्णास कोरोनाची लागन झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

बुलडाणा : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी आयसोलेशन कक्षात दाखल केल्याच्या तासाभरात मृत्यू झालेल्या रुग्णाचा मृत्यू कोरोना आजारानेच झाल्याचे रविवारी स्पष्ट झाले. नागपूर येथील प्रयोगशाळेचा अहवाल रविवारी प्राप्त झाला असून, सदर रुग्णाचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे अहवालावरून स्पष्ट होत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्स डॉ. प्रेमचंद पंडित यांनी सांगितले. पश्चिम वºहाडातील हा पहिलाच बळी ठरला असून, त्यामुळे तिन्ही जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी सकाळी ठेवण्यात आलेल्या एका व्यक्तीचा अवघ्या तासाभरातच उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. मृत पावलेल्या व्यक्तीला निमोनिया झाला होता. तो अधिक वाढल्यामुळे त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, परदेश दौऱ्याची तशी या रुग्णाची कुठलीही हिस्ट्री नव्हती. या मृत व्यक्तीचे स्वॅब नमुने ‘हार्ड अ‍ॅन्ड फास्ट’ तत्वावर नागपूर येथे पाठविण्यात आले होते. नागपूर येथून अहवाल प्राप्त झाल्यानंतर सदर रुग्णास कोरोनाची लागन झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे.मृत व्यक्ती ही बुलडाणा शहरातीलच असून ती वयोवृद्ध नव्हती. बुलडाणा शहरातीलच एका खासगी रुग्णालयामध्ये गेल्या दोन दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांचा निमोनिया हा अधिकच वाढत गेला. त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळली होती. परिणामी २८ मार्च रोजी सकाळी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यात आलेल्या ९२ परदेशी नागरिकांची तपासणी करण्यात आलेली असून यापूर्वी नागपूर येथे पाठविण्यात आलेल्या ११ जणांचे स्वॅब नमुनेही निगेटीव्ह आले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbuldhanaबुलडाणा