शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
3
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
4
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
5
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
6
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
7
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
8
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
9
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
10
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
11
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
12
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
13
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
14
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
15
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
16
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
17
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
18
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
19
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
20
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)

corona virus : मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी पोहोचला शंभर दिवसांवर, 'या' चतु:सूत्रीमुळे यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2020 07:01 IST

मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी २५ ऑगस्ट रोजी ९३ दिवस होता. त्यानंतर संसर्गाचे प्रमाण वाढल्याने १४ सप्टेंबर रोजी तो ५४ दिवस झाला.

मुंबई : चेस द व्हायरस, मिशन झीरो, ट्रेसिंग-ट्रॅकिंग-टेस्टिंग-ट्रीटिंग या चतु:सूत्रीनुसार करण्यात येत असलेली कार्यवाही; ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम, पोलिसांच्या मदतीने राबविण्यात येत असलेल्या प्रतिबंधविषयक बाबी आणि मुंबई पालिकेने केलेल्या अथक प्रयत्नांमुळे मुंबईत कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग मंदावला आहे. बुधवारी रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीने पहिल्यांदाच तब्बल १०२ दिवसांचा टप्पा गाठला. रुग्णवाढीचा वेग १.२२ वरून ०.६९ टक्क्यांवर आला आहे.मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी २५ ऑगस्ट रोजी ९३ दिवस होता. त्यानंतर संसर्गाचे प्रमाण वाढल्याने १४ सप्टेंबर रोजी तो ५४ दिवस झाला. १ ऑक्टोबरला तो ६६ दिवस, १० ऑक्टोबरला ६९, तर २१ ऑक्टोबरला १०२ दिवस एवढा नोंदविण्यात आला. १० ते २१ ऑक्टोबर या साधारणपणे १० दिवसांच्या कालावधीत रुग्णदुपटीचा कालावधी ६९ दिवसांवरून ३१ दिवसांनी वाढून १०२ दिवस झाला आहे.मुंबईतील २४ विभागांपैकी ३ विभागांत रुग्णदुपटीचा कालावधी १५० दिवसांपेक्षा अधिक आहे. ११ विभागांमध्ये तो १०० दिवसांपेक्षा अधिक आहे. तो १५० दिवसांपेक्षा अधिक असणाºया ३ विभागांमध्ये जी दक्षिण विभागातील रुग्णदुपटीचा कालावधी सर्वाधिक म्हणजे १७५ दिवस आहे. त्याखालोखाल इ विभागात १६०, तर एफ दक्षिण विभागात १५७ दिवस आहे. ३ विभागांव्यतिरिक्त इतर ११ विभागांमध्ये रुग्णदुपटीचा कालावधी १०० दिवसांपेक्षा अधिक आहे. या ११ विभागांमध्ये बी विभागात तो १३७, जी उत्तर विभागात १३६ आणि एम पूर्व व ए विभागात १३५ दिवस इतका आहे.

रुग्णदुपटीचा कालावधी म्हणजे काय?कोरोना संसर्गाचे विश्लेषण करताना त्यात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. रुग्ण दुप्पट होण्याचे दिवस म्हणजेच कालावधी जेवढा अधिक तेवढी ही बाब अधिक सकारात्मक असते. ही आकडेवारी एका आठवड्याच्या म्हणजेच ७ दिवसांच्या कालावधीच्या आकडेवारीचे केलेले सांख्यिकीय विश्लेषण असते.

‘मिशन झीरो’ हे ध्येयमुंबईकरांच्या सहकार्यामुळेच कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांना बळ मिळत आहे. ‘मिशन झीरो’ हे आपले ध्येय आहे. ते गाठण्यासाठी सर्वांनीच आपापल्या स्तरावर अधिक प्रयत्न करायचे आहेत.- इक्बाल सिंह चहल, आयुक्त, मुंबई महापालिका 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस