शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : बारामतीसह राज्यात सहा ठिकाणी होणार कोरोनाचे निदान; राज्य शासनाची मान्यता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 20:43 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोविद -१९ तपासणीसाठी विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा सुरु करण्यास मान्यता

ठळक मुद्देबारामतीकरांना प्रयोगशाळा उभारणीची प्रतीक्षा

बारामती : वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभुमीवर राज्यात बारामतीसह सहा ठिकाणी कोविद -१९ तपासणीसाठी विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा (व्हीआरडीएल)सुरु करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता शहरातील कोरोना संशयिताची शहरातील वैद्यकीय महाविद्यालयात तपासणी करणे शक्य होणार आहे.मात्र, त्यासाठी प्रयोगशाळा उभारण्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे.वैद्यकिय शिक्षण विभागाने याबाबत वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाच्या संचालकांना सुचना दिली आहे. १५ एप्रिल रोजी याबाबत निर्णय घेण्यात आला.यामध्ये बारामतीसह कोल्हापूर, जळगाव, गोंदिया, नांदेड व अंबाजोगाई येथील वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्ये विभागाच्या नियंत्रणाखालील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोविद -१९ तपासणीसाठी विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा (व्हीआरडीएल) सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. प्रस्तावित प्रयोगशाळा स्थापित करण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्याची जबाबदारी संबंधित संस्थाप्रमुख व संचालनालयावर देण्यात आली आहे. प्रयोगशाळा संबंधित संस्थेस उपलब्ध होणाऱ्या राज्ययोजनांसह जिल्हावार्षिक योजना,महात्मा फुले जन आरोग्य योजना आदी उपलब्ध निधीतुन स्थापित करावी. तसेच संबंधित संस्थेतील उपलब्ध मनुष्यबळातून प्रयोगशाळाचालविण्याची सुचना शासनाने दिली आहे.बारामती शहरात सात कोरोना संसर्ग बाधित रुग्ण आढळले आहेत. सातव्या रुग्णाशी सबंधित १६ जण पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.त्यापैकी १४ जणांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे.उर्वरीत दोघांचे अहवाल शुक्रवारी(दि १७) मिळणे अपेक्षित आहे.शासनाच्या आजच्या सुचनेनुसार या ठिकाणी कोरोना तपासणी प्रयोगशाळा सुरु होण्याचा मार्ग मोकळा झालाआहे.मात्र,याबाबत प्रयोगशाळा सुरु करावी लागणार आहे. प्रयोगशाळा उभारणी, आवश्यक यंत्रणा,मनुष्यबळाची उपलब्धता यावर अवलंबुन आहे. तोपर्यत बारामती येथील संशयित रुग्णांना पुणे येथील तपासणी यंत्रणेवर अवलंबुन राहावे लागणार आहे.पुणे येथे संशयित रुग्ण नेणे—आणने,तपासणीची प्रक्रिया वेळखाऊ आहे.त्यामुळे बारामती येथे संबंधित प्रयोगशाळा लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी होत आहे.याबाबत प्रस्ताव पाठवणार असल्याचे येथील वैद्यकीय महाविदयालयाचे प्रमुख संजीवकुमार तांबे यांनी सांगितले .

टॅग्स :BaramatiबारामतीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcollegeमहाविद्यालयdoctorडॉक्टरState Governmentराज्य सरकार