शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : राज्यातील कोरोना बळींची संख्या गेली १ लाखावर, दिवसभरात झाली १२,५५७ रुग्णांची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 08:37 IST

Corona virus: राज्यात १४,४३३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, राज्यात आजपर्यंत एकूण ५५,४३,२६७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.०५ टक्के एवढे झाले आहे.

मुंबई : राज्यात रविवारी १२,५५७ रुग्णांचे निदान झाले असून, २३३ मृत्यूंची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५८,३१,७८१ झाली असून, मृतांच्या आकडा १ लाख १३०वर पोहोचला आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून दोन लाटांवर राज्य शासनाने नियंत्रण मिळविले आहे. मात्र, दुसरीकडे कोविडने एक लाखाहून अधिक जणांचे प्राण घेतले, ही चिंताजनक बाब आहे.राज्यात १४,४३३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, राज्यात आजपर्यंत एकूण ५५,४३,२६७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.०५ टक्के एवढे झाले आहे. राज्यात एकूण १,८५,५२७ सक्रिय रुग्ण आहेत. सध्या राज्यातील मृत्युदर १.७२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासलेल्या ३,६५,०८,९६७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५.९७ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. 

सक्रिय रुग्णांची संख्या दोन लाखांच्या खाली- राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख ८५ हजार ५२७ इतकी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक असली तरी त्यात घट होताना दिसत आहे ही दिलासादायक बाब आहे. पुण्यात एकूण २१ हजार २१६ इतके रुग्ण आहेत. - मुंबई पालिका हद्दीत हा आकडा १८ हजार ४१ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या १६ हजार ६७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस