शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

Corona Virus : किंचित दिलासा! राज्यात गेल्या २४ तासांत २९,९११ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; रिकव्हरी रेट ९१.४३ टक्क्यांवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 22:07 IST

Corona Virus in Maharashtra : राज्यात गेल्या २४ तासांत २९ हजार ९११ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ७३८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५४ लाख ९७ हजार ४४८वर पोहोचली आहे.

ठळक मुद्देआतापर्यंत ८५ हजार ३३५ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात ३ लाख ८३ हजार २५३ जणांवर उपचार सुरू आहेत.

मुंबई : राज्यात नव्या कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत आता घट होताना दिसत आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत २९ हजार ९११ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात ४७ हजार ३७१ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९१.४३ टक्के इतके आहे. मात्र, कोरोना मृत्यूचा आकडा हा कालच्या तुलनेत आज वाढला आहे. गेल्या २४ तासांत ७३८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. (Maharashtra reports 29,911 new COVID19 cases, 47,371 recoveries and 738 deaths in the last 24 hours)

राज्यात गेल्या २४ तासांत २९ हजार ९११ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ७३८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५४ लाख ९७ हजार ४४८वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ८५ हजार ३३५ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात ३ लाख ८३ हजार २५३ जणांवर उपचार सुरू आहेत.

आज राज्यात ४७ हजार ३७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण ५० लाख २६ हजार ३०८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९१.४३ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५५ टक्के एवढा आहे. 

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी २१ लाख ५४ हजार २७५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५४ लाख ९७ हजार ४४८ (१७.०९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २९ लाख ३५ हजार ४०९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २१ हजार ६४८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत १ हजार ४२५ नवीन कोरोना बाधितांची नोंद मुंबईत आज १ हजार ४२५ नवीन कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर एकूण ५९ जणांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत आज केवळ १ हजार ४६० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मंबईत आज एकूण २९ हजार ३९१ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यातील १ हजार ४२५ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या. मुंबईत सध्या २९ हजार ५२५ अँक्टिव्ह रुग्ण आहेत.

पुण्यात ९३१ नागरिकांना कोरोनाची लागणपुण्यात दिवसभरात ९३१ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ६६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दिवसभरात १०७६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. पुण्यात एकूण रूग्णसंख्या ४६३१०३ आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस