शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine: मोठी बातमी! लहान मुलांवर होणार 'कोव्हॅक्सिन' लसीची चाचणी; २ ते १८ वयोगटातील १७५ मुलांचा सहभाग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 08:56 IST

मुलांना मोठ्यांचीच कोव्हॅक्सिन देणार, नागपुरात मानवी चाचणीसाठी नोंदणी होणार

ठळक मुद्देप्रत्येक वयोगटात जवळपास २५ मुले-मुलींचा सहभाग राहणार आहे. यामध्ये सुदृढ आरोग्य असलेल्या मुलांची समितीद्वारे निवड करण्यात येईल.यासाठी लवकरच नोंदणीला सुरुवात होणार आहे. परंतु आतापासून अनेक पालकांकडून या संदर्भात विचारणा होत आहे. लहान मुलांची आरटीपीसीआर चाचणी केली जाईल. सोबतच अ‍ॅण्टिबॉडी तपासणी केली जाईल

 नागपूर : कोरोनाचा गंभीरतेपासून लहान मुलांना दूर ठेवण्यासाठी भारत बायोटेक कंपनीच्या ‘कोव्हॅक्सिन’ लसीची मुलांवरील मानवी चाचणी लवकरच नागपुरात सुरू होणार आहे. २ ते १८ वयोगटांतील जवळपास १७५ मुलांवर ही चाचणी होईल. विशेष म्हणजे, सध्या सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत मोठ्यांना दिली जाणारी कोव्हॅक्सिनची लस चाचणीत सहभागी लहान मुलांना दिली जाणार आहे, अशी माहिती बालरोग तज्ज्ञ डॉ. वसंत खळतकर यांनी दिली.

लसीकरण मोहिमेत १८ वर्षांवरील लोकांचे होत असलेले लसीकरण, कोरोना विषाणूमधील ‘म्युटेशन’ (बदल) व कोरोना प्रतिबंधक नियमाचे योग्य पद्धतीने पालन होत नसल्याने तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नुकतेच भारत बायोटेक कंपनीला लहान मुलांवर ‘कोव्हॅक्सिन’ लसीच्या ‘ट्रायल’साठी भारतीय औषधी महानियंत्रकने (डीसीजीआय) मंजुरी दिली. यामुळे ‘एम्स’ पाटना, फेलिक्स हॉस्पिटल नोयेडा, इन्स्टियूट आफ चाईल्ड निलोफर हॉस्पिटल हैदराबाद व नागपुरात वरिष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. वसंत खळतकर यांना या चाचणीसाठी परवानगी दिली. भारतात एकूण ५२५ सदृढ आरोग्य असलेल्या मुलांवर ही चाचणी केली जाणार आहे. 

तीन वयोगटांत चाचणीडॉ. खळतकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले, कोव्हॅक्सिन लसीची ही चाचणी २ ते ६, ७ ते १२ आणि १३ ते १८ या तीन वयोगटांत विभागण्यात आली आहे. प्रत्येक वयोगटात जवळपास २५ मुले-मुलींचा सहभाग राहणार आहे. यामध्ये सुदृढ आरोग्य असलेल्या मुलांची समितीद्वारे निवड करण्यात येईल. यासाठी लवकरच नोंदणीला सुरुवात होणार आहे. परंतु आतापासून अनेक पालकांकडून या संदर्भात विचारणा होत आहे. 

रक्ताच्या चाचणीनंतरच करणार निवडलहान मुलांची आरटीपीसीआर चाचणी केली जाईल. सोबतच अ‍ॅण्टिबॉडी तपासणी केली जाईल. दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्यावर मुलाची निवड होईल. पहिला डोस ‘०.५ एमएल’चा दिला जाईल. त्यानंतर २८ दिवसांनंतर दुसरा डोस दिला जाईल. त्यापूर्वी रक्ताची चाचणी केली जाईल. मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी डॉक्टरांची एक पथक राहणार आहे. ते फोनद्वारे मुलांच्या किंवा त्यांच्या पालकांच्या संपर्कात राहतील. इथिकल समितीची मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष चाचणीला सुरुवात होईल.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस