शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: कोरोना बळींची संख्या वाढतीच; लसीकरणावरही मोठ्या मर्यादा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 07:36 IST

लसींचा साठाच नियंत्रित स्वरूपात उपलब्ध होत असल्याने लसीकरणाच्या वेगावरही काहीशा मर्यादा आल्या आहेत.

उत्तर महाराष्ट्रात विशेषत: नाशिक, धुळे आणि नगर जिल्ह्यांत कोरोनाबाधित आणि बळींच्या संख्येत कमालीच्या वेगाने भर पडत आहे. ऑक्सिजन बेड्स, व्हेंटिलेटरच्या वापराबाबत अनास्था दिसत आहे. दुसरीकडे लसींचा साठाच नियंत्रित स्वरूपात उपलब्ध होत असल्याने लसीकरणाच्या वेगावरही काहीशा मर्यादा आल्या आहेत.धुळे- आठवडाभरात २६ रुग्णांचा मृत्यूजिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. दररोज सरासरी ४०० पेक्षा अधिक रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. बाधित रुग्णांची संख्या २८ हजार ८३३ इतकी झाली आहे. आतापर्यंत २३ हजार ९७१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ४६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १ एप्रिल ते ६ एप्रिल या कालावधीत २ हजार २७३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. नंदुरबार- सहा दिवसांत ६४ जणांचा मृत्यूनंदुरबार जिल्ह्यात सहा दिवसांत कोरोनाने ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यू दर १.९० टक्के आहे. सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या सात हजार ८२८ आहे. सहा दिवसांत नवीन तीन हजार ६६१ रुग्ण आढळून आले आहेत. एकूण तपासणीच्या हा ३५ टक्के पाॅझिटीव्हिटी दर आहे. नाशिक- आठवडाभरात दीडशेवर बळीएप्रिल महिन्यात जिल्ह्यातील कोरोनाबाधित आणि बळींच्या संख्येत कमालीच्या वेगाने भर पडत आहे. दिवसाला सरासरी ४ ते ५ हजार बाधित होत आहेत. मंगळवारी तर कोरोना बळींचा ३२ इतका उच्चांक नोंदला गेला. अवघ्या आठवडाभरात १५० हून अधिक बळी, ही स्थिती झाल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका बसलेल्या शहरांमध्ये नाशिकदेखील अव्वल पाचात पोहोचले आहे.जळगाव- १३००पेक्षा अधिक रुग्ण ऑक्सिजनवरएप्रिल महिन्यातील सुरुवातीच्या सहा दिवसांत कोरोनाचा सर्वाधिक फटका जळगाव शहर आणि चोपडा तालुक्याला बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दोन्ही ठिकाणी कोरोनाचे अडीचशेपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत, तर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील या दोन ठिकाणांशिवाय फक्त भुसावळ तालुक्यात जास्त आहे.सध्या चोपडा तालुक्यात २५६० रुग्ण उपचार घेत आहेत, तर जळगाव शहरात २५०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अहमदनगर- ११ हजार सक्रिय रुग्णअहमदनगर जिल्ह्यात सध्या ११ हजार सक्रिय रुग्ण आहेत. ही संख्या पाच दिवसांत १५ हजारांच्या जवळपास जाईल, असे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी सांगितले. जिल्ह्यात सध्या रोज सरासरी १६७० रुग्ण बाधित होत आहेत. गेल्या आठ दिवसांत १३,३७४ रुग्ण आढळले आहेत. अहमदनगर शहरात रोज पाचशे जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येत आहे.  सध्या उपचार घेत असलेले शहर     २५०७ग्रामीण     ३७६भुसावळ     १०००चोपडा     २५६०धरणगाव     ५०४    भडगाव     ४२५चाळीसगाव     ४७४भुसावळ : १ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ६ एप्रिलला उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १३१२ रुग्ण हे ऑक्सिजनवर आहेत, तर आयसीयूमध्ये दाखल रुग्ण ५५७ आहेत. ऑक्सिजनवर असलेले १३१२ व आयसीयूत असलेले ५५७ रुग्ण ही गेल्या वर्षातील सर्वोच्च आकडेवारी आहे.गंभीर रुग्णांसोबत मृत्यूचे प्रमाणदेखील वाढले आहे. गेल्या सहा दिवसांत ८७ मृत्यू झाले. ११,६४६ रुग्णांपैकी लक्षणे असलेले रुग्ण हे २६२१ आहेत, तर लक्षणे नसलेले रुग्ण हे ९,०२५ आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस