शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: नऊ कोटी लसीकरणाचे कौतुकही करायला हवे; भारती पवारांचा राज्य सरकारला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 07:57 IST

लसींवरून टीका करणाऱ्यांनी आता नऊ कोटींचा टप्पा गाठला म्हणून कौतुक करायला हरकत नाही, असा टोलाही महाविकास आघाडीतील पक्षांना लगावला. 

मुंबई : देशातील प्रत्येक राज्यात मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू आहे. लवकरच लसीकरणाचा शंभर कोटींचा टप्पा पार होईल. काही राज्यांमध्ये शंभर टक्के लसीकरण झाले आहे. महाराष्ट्रातही नऊ कोटी लसीकरण झाले असून राज्यांच्या मागणीनुसार लस पुरवल्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी माध्यमांना सांगितले. तर, लसींवरून टीका करणाऱ्यांनी आता नऊ कोटींचा टप्पा गाठला म्हणून कौतुक करायला हरकत नाही, असा टोलाही महाविकास आघाडीतील पक्षांना लगावला. देशातील लसीकरणाचा आकडा शंभर कोटींजवळ पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री भारती पवार यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला. लवकरच भारतात एका इतिहासाची नोंद होईल. शंभर कोटी लसीकरणाचा आकडा आपण पार करू. एकेकाळी लस आणायला वर्षानुवर्षे लागायची मात्र यावेळी लवकरच लस उपलब्ध केली गेली. आजही युद्धपातळीवर लसीकरणाचे काम सुरू आहे. लसीसाठी ३५ हजार कोटींची तरतूदही करण्यात आली होती. नऊ महिन्यात यशस्वीरित्या लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्यात आले. जगातील अनेक देश भारताच्या या कामगिरीचे कौतुक करीत आहेत. देशातील प्रत्येक नागरिकाला लस मिळायला हवी याकडे मोदींनी लक्ष दिल्याचे सांगतानाच इतक्या मोठ्या प्रमाणातील लसीकरण टीम वर्कमुळे शक्य झाल्याचेही भारती पवार म्हणाल्या. आता लहान मुलांच्या लसीकरणाची तयारी सुरू असल्याचे सांगून पवार म्हणाल्या की, आवश्यक परवानग्या, मान्यता मिळताच लहान मुलांचे लसीकरण सुरू होईल. अद्याप दुसऱ्या लाटेचे संकट टळले नाही. शिवाय, तिसरी लाट येऊ नये यासाठी काळजी घेतली पाहिजे. केंद्र सरकार तिसऱ्या लाटेवर लक्ष ठेवून असल्याचेही पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसDr Bharti Pawarडॉ. भारती पवार