शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: राज्याला जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मिळणार ४० लाख लसी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 08:35 IST

लसीकरणाचा वेग कमी असणाऱ्या जिल्ह्यांना प्राधान्य देतानाच सक्रिय रुग्ण, पॉझिटिव्हीटी दर हे मुद्दे समोर ठेवून लसींचे वितरण करण्यात येईल. 

मुंबई : राज्याला जूनच्या दुसऱ्या आठवड्यात ४० लाख लसींचा नवा साठा मिळणार आहे. तर १८-४४ वयोगटासाठी २० लाख लसींच्या खरेदीचा प्रस्ताव केंद्राकडे अखेरच्या टप्प्यात असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाने सांगितले.लसीच्या या साठ्यातून दुसरा डोस घेणाऱ्यांचे जास्तीत जास्त लसीकरण पूर्ण करण्याचे आरोग्य विभागाचे उद्दिष्ट आहे. तसेच ४५ हून अधिक वयोगटाला पहिला डोसही देण्यात येईल. राज्याचे लसीकरण अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी सांगितले की, लसीकरणाचा वेग कमी असणाऱ्या जिल्ह्यांना प्राधान्य देतानाच सक्रिय रुग्ण, पॉझिटिव्हीटी दर हे मुद्दे समोर ठेवून लसींचे वितरण करण्यात येईल. १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण होणार पूर्ववत केंद्राकडून मिळणारा लसींचा साठा आणि राज्य खरेदी करत असलेला लसींचा साठा याचा समतोल राखून त्यानंतर १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण पूर्ववत सुरू करण्याविषयी अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे डॉ. दिलीप पाटील यांनी सांगितले.धारावीची वाटचाल कोरोनामुक्तीच्या मार्गावर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत धारावीने पुन्हा एकदा कोरोनावर मात केली आहे. या भागात कोरोना रुग्णांचे प्रमाण नियंत्रणात आले असून आता केवळ १९ सक्रिय रुग्ण येथे आहेत. गुरुवारी या विभागात केवळ एका बाधिताची नोंद झाली. त्यामुळे धारावी परिसर कोरोनामुक्तीच्या मार्गावर असल्याचे दिसते आहे.दुसऱ्या लाटेत महापालिकेच्या जी उत्तर विभागाने धारावी पॅटर्न पुन्हा एकदा राबवला. जास्तीत जास्त लोकांची चाचणी करून त्यांचे विलगीकरण व उपचारावर भर देण्यात आला. मोबाइल चाचणी व्हॅन, फिव्हर क्लिनिक, बाधितांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्यात आला. याचा प्रभाव आता दिसून येत आहे. गेल्या आठवड्यापासून धारावीत दररोज तीन ते चार बाधित आढळून येत आहेत.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस