शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

OBC Reservation Empirical Data: ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी घराेघरी सर्वेक्षण करून डेटा संकलित करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 08:58 IST

आयाेगाने इम्पिरिकल डेटासाठी प्रश्नाेत्तरांच्या स्वरूपात अर्ज तयार केला आहे. आयाेगाने या कामासाठी निवृत्त आयएएस अधिकारी महेश झगडे यांची नियुक्ती केली आहे.

नागपूर : ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयाेगातर्फे राज्यभर घराेघरी सर्वेक्षण करून इम्पिरिकल डेटा गाेळा करण्यात येणार आहे. ही एक प्रकारे समांतर जनगणनाच असेल.हे सर्वेक्षण समाज व जातीआधारित असणार आहे. यामध्ये कुटुंबातील एका सदस्याकडून प्रश्नाेत्तराच्या स्वरूपात असलेल्या फाॅर्ममध्ये इतर सदस्यांची माहिती नोंदवून घेतली जाईल. यापूर्वी आयाेगाकडून केवळ नमुना सर्वेक्षण हाेणार असल्याची माहिती समाेर आली हाेती. मात्र, गुरूवारी पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आयाेगाने इम्पिरिकल डेटासाठी प्रश्नाेत्तरांच्या स्वरूपात अर्ज तयार केला आहे. आयाेगाने या कामासाठी निवृत्त आयएएस अधिकारी महेश झगडे यांची नियुक्ती केली आहे. झगडे यांना जनगणनेच्या उत्कृष्ट कामासाठी केंद्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. राज्यातील प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रत्येक जातीची राजकीय मागासलेपणाची काय स्थिती आहे, हे तपासले जाईल. एखाद्या जातीची नागपूर महापालिकेतील मागासलेपणाची स्थिती औरंगाबाद महापालिकेतही असेलच असे नाही. झगडे यांच्यानुसार, प्रश्नावली अंतिम झाल्यानंतर आयाेग या कामासाठी पहिल्या टप्प्यातील निधी शासनाकडे मागण्यात येईल. सरकार डेटा गाेळा करण्यासाठी किती प्रगणकांची नियुक्ती करते, यावर अहवाल सादर करण्याचा कालावधी अवलंबून राहील. ५० घरांसाठी एक प्रगणक नेमण्यात यावा, अशी शिफारस राहील. त्यांनी गाेळा केलेल्या डेटाचे विश्लेषण करण्यासाठी दीड ते दाेन महिन्यांचा कालावधी लागेल, असेही झगडे यांनी नमूद केले.सर्वेक्षणाची प्रश्नाेत्तरेऔरंगाबाद येथील आयाेगाचे सदस्य ॲड. बी.एल. सागर किल्लारीकर यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना सर्वेक्षणाची प्रश्नाेत्तरे पाच भागांत विभागल्याची माहिती दिली. यात कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय  मागासलेपण याबाबत माहितीचा समावेश असेल. याबाबत १९ जानेवारीला बैठक आहे. एका व्यक्तीला प्रश्नावली भरण्यास एक ते दीड तास लागेल. लाेक एवढी उत्तरे भरण्यासाठी तयार हाेतील की नाही, याबाबत झगडे यांचा सल्ला घेण्यात येईल. डेटा गाेळा करण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांना कशा प्रकारे प्रशिक्षण द्यावे, याबाबतही चर्चा हाेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षण