शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा ९ जिल्ह्यांमध्ये पुन्हा फैलाव, आराेग्य विभागाचा त्रिसूत्री कृती कार्यक्रम, खबरदारीच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 06:41 IST

CoronaVirus News In Maharashtra : टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, अमरावती, अकोला, नंदूरबार, वर्धा, रत्नागिरी, भंडारा, गडचिरोली, नांदेड आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी दर अधिक असल्याचे निदर्शनास येत आहे.

मुंबई : अनलॉकचा पुढचा टप्पा सुरू झाल्यानंतर होत असलेल्या रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. तर संसर्ग नियंत्रणात आल्यानंतरही राज्यातील नऊ जिल्ह्यांत अधिक असणाऱ्या पॉझिटिव्हीटी दराचे प्रमाण कमी कऱण्यासाठी त्या-त्या जिल्ह्यांत विशेष लक्ष देण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे.याविषयी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्समधील तज्ज्ञांची बैठक पार पडली. या बैठकीत टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, अमरावती, अकोला, नंदूरबार, वर्धा, रत्नागिरी, भंडारा, गडचिरोली, नांदेड आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी दर अधिक असल्याचे निदर्शनास येत आहे. हा दर कमी करण्यासाठी त्रिसूत्री कृती कार्यक्रम हाती घेण्यात आला असून त्या अंतर्गत सहवासितांचा शोध, निदान व चाचणी या माध्यमातून काम कऱण्यात येत आहे. तसेच, कोरोनाविषयक उपचारांबाबत जनजागृती, प्रशिक्षण व समुपदेशनाद्वारे या प्रक्रिया हाताळण्यात येत आहेत.नागपूर, सातारा आणि नाशिक येथे अजूनही दैनंदिन रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. नागरिकांनी विषाणूच्या प्रादुर्भावाबाबत बेफिकीर राहू नये. त्याकरिता या वर्षअखेरपर्यंत मास्कचा वापर बंधनकारक आहे. सामान्यांनीही नियंत्रणात सहभाग घेतला पाहिजे, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

राज्यात उद्यापासून देणार लसीचा दुसरा डोस- देशातील दिल्ली, गुजरात, तामिळनाडूसह विविध राज्यांमध्ये कोरोना लसीचा दुसरा डोस देण्याच्या टप्प्याला शनिवारपासून प्रारंभ झाला. मात्र महाराष्ट्रामध्ये सोमवार, १५ फेब्रुवारीपासून या टप्प्याला सुरूवात होणार आहे.-  १६ जानेवारी रोजी कोरोना लसीकरणाच्या मोहिमेला देशभरात प्रारंभ झाला. लसीचा पहिला डोस दिल्यानंतर २८ दिवसांनी शनिवारी या लसीचा दुसरा डोस देण्यास सुरूवात झाली आहे. शुक्रवारपर्यंत देशभरात ७९६७६४७ लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला होता.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस