शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

corona virus-कोरोनाचा रूग्ण आढळलेले शृंगारतळी आयसोलेट, जिल्ह्यातील हॉटेल, बार, टपऱ्या बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 13:49 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे कोरोनाचा रूग्ण आढळल्यानंतर संपूर्ण यंत्रणा सतर्क झाली आहे. या भागातील तीन किलोमीटरचा परिसर आयसोलेट करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी गुरूवारी सकाळी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्दे जिल्ह्यातील हॉटेल, बार, टपऱ्या बंदजीवनावश्यक वस्तूच मिळणार, एस्. टी. बसेस टप्प्या टप्प्याने बंद करणार

रत्नागिरी : जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे कोरोनाचा रूग्ण आढळल्यानंतर संपूर्ण यंत्रणा सतर्क झाली आहे. या भागातील तीन किलोमीटरचा परिसर आयसोलेट करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी गुरूवारी सकाळी पत्रकार परिषदेत दिली. तर पुढील दोन किलोमीटरचा परिसरसुद्धा बफरझोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.राज्यात कोरोनाचे रूग्ण आढळल्याने सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. बुधवारी रात्री जिल्ह्यातील शृंगारतळी (ता. गुहागर) येथील ५० वर्षीय व्यक्तीचे कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर संपूर्ण यंत्रणा सतर्क झाली आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी रात्रीच तातडीने सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन उपाययोजनांबाबतच्या सूचना दिल्या.जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाग्रस्त रूग्णाच्या कुटुंबियांनाही तपासणीसाठी घेण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी मिश्रा यांनी सांगितले. त्याचबरोबर त्यांच्या संपर्कात जेवढी लोक आली आहेत, त्यांचा शोध घेऊन त्यांना तपासणीसाठी ताब्यात घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

तसेच शृंगारतळीच्या परिसरात अन्य कोणालाही फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. गावातील पालखी ग्रामप्रदक्षिणाही बंद करण्यात आली असून, त्याचे उल्लंघन केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांची गर्दी टाळण्यासाठी गुरूवारपासूनच हॉटेल, बार, टपऱ्या बंद करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात येणार आहेत. तसेच येत्या काही दिवसात जिल्ह्यातील एस्. टी. सेवा टप्प्याटप्याने बंद करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.परदेशातून आलेल्या व्यक्तींनी तत्काळ जिल्हा शासकीय रूग्णालयात येऊन तपासणी करून घ्यावी. परदेशातून आलेल्या व्यक्तींनी आपली माहिती लपविल्यास आणि त्यानंतर त्यांच्याबाबतीत माहिती उपलब्ध झाल्यास त्यांच्यासह कुटुुंबियांवरही गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी मिश्रा यांनी सांगितले. 

रत्नागिरी कोरोना अलर्ट :  जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा

▪कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हायातील हाॅटेल, बार, टपऱ्या होणार बंद

▪आजपासून केवळ जिवनावश्यक वस्तुंची दुकाने सोडून सर्व दुकाने बंद केली जाणार

▪जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची माहिती

▪येत्या काही दिवसात जिल्ह्यातील एसटी सेवा टप्याटप्याने बंद करणार

▪जिल्ह्यात धार्मिक कार्यक्रमांवर बंद, बंदीचे उल्लघन करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार

▪परदेशातून आलेल्या व्यक्तींनी माहिती लपवण्याचा प्रयत्न केल्यास संपुर्ण कुटुंबावर गुन्हे दाखल करणार- जिल्हाधिकारी

▪पाॅझिटिव्ह आढळलेल्या गुहागरमधील शुंगारतळी इथली तीन किलोमिटरा परिसर आयसोलेट

▪तर पुढील दोन किलोमिटरचा परिसर सुद्धा बफरझोन म्हणून जाहिर 

▪या परिसरात अन्य कोणालाही फिरता येणार नाही- जिल्हाधिकारी

▪गावातील पालखीच्या ग्रामप्रदक्षणेवर बंदी 

▪उल्लघन केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार - जिल्हाधिकारी

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरीcollectorजिल्हाधिकारी