शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

corona in kolhapur -कोल्हापुरात चौथा रुग्ण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 16:57 IST

कोल्हापूर शहरातील एका महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत तिघांना कोरोना विषाणूची लागण झाली होती, त्यात आता या रुग्णाची भर पडली आहे.

ठळक मुद्देकोल्हापुरात चौथा रुग्ण पॉझिटिव्ह‘सीपीआर’मधील सहा, अन्य रुग्णालयांतील दोघाजणांचा स्राव तपासणीसाठी मिरजेला 

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील एका महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत तिघांना कोरोना विषाणूची लागण झाली होती, त्यात आता या रुग्णाची भर पडली आहे. ही महिला सातारहून कोल्हापुरात आली होती. याबाबत सविस्तर माहिती रुग्णालय प्रशासन लवकरच देत आहे. ही महिला ६३ वर्षीय असून तिला न्यूमोनिया झाला होता. सीपीआर येथे उपचार घेणाऱ्या ६३ वर्षीय महिलेचा कोरोनाबाबतचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.कोल्हापुरात उपचार घेणारे दोन आणि मिरज येथे उपचार घेणारी युवती असे एकूण तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह होते, यात आता चौथ्या रुग्णाची भर पडली आहे . कसबा बावडा येथे राहणारी ही महिला 20 व 21 मार्च रोजी सातारा येथे गेली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 22 ते 28 मार्च ती कोरेगाव तालुक्यातील बनवडे येथे गेली होती. 28 मार्च रोजी ती कोल्हापूरमध्ये परत आली होती. तीला सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे 30 मार्चला दिसून आली.

दुसऱ्याच दिवशी 31 मार्चला खासगी रुग्णालयात तिने उपचार घेतला. 3 एप्रिल रोजी बावड्यातील सेवा रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सीपीआरमध्ये दाखल करुन तिचा स्वॅब घेण्यात आला. याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला.   यादरम्यान  तिच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेवून त्याबाबत पुढील खबरदारीचे उपाय म्हणून कार्यवाही सुरु आहे.

येथील कोरोना विषाणूची लक्षणे असणाऱ्या संशयित एकूण आठ रुग्णांच्या घशातील स्राव (स्वॅब) हे मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रविवारी सकाळी पाठविण्यात आले. त्यात छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील (सीपीआर) सहा, तर अन्य रुग्णालयांतील दोन रुग्णांचा समावेश आहे. पूर्वीच्या दोन पॉझिटिव्ह रुग्णांची बुधवार (दि. ८) ते दि. १२ एप्रिलदरम्यान सलग दोन दिवस पुन्हा तपासणी आणि त्यांच्या स्रावाची चाचणी केली जाणार आहे.‘सीपीआर’मधील विशेष तपासणी कक्षातून रविवारपर्यंत ४६१६ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. सध्या रुग्णालयात आठ रुग्ण दाखल आहेत. त्यांचे स्राव मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. रविवारी ६५ जणांची तपासणी करण्यात आली. त्यांतील २२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. पूर्वी आढळलेल्या कोरोना संशयित दोन रुग्णांवर खासगी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत. त्यांची बुधवारनंतर सलग दोन दिवस तपासणी आणि त्यांच्या स्रावांची चाचणी करण्यात येणार आहे.कोरोनाबाबतची रविवारपर्यंतची एकूण आकडेवारी

  •  तपासलेले प्रवासी अथवा व्यक्ती : ४६१६
  •  डिस्चार्ज झालेले : १६७
  •  तपासणी केलेले नमुने : ३००
  • तपासणी अहवाल प्राप्त : २९२
  •  चाचणी अहवाल निगेटिव्ह : २५१

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर