शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Corona Effect: तिरुपती बालाजी देवस्थानला पैशांची चणचण, शिर्डीच्या साई मंदिराने दाखवले उदार मन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 14:54 IST

तिरुपती देवस्थानाचे दोन महिन्यांत सुमारे ४०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे तब्बल 21 हजार कर्मचाऱ्यांना या महिन्यात वेळेवर पगार देण्यात आला नसून पगार देण्यास उशीर होईल,असे मंदिर प्रशासनाकडून कर्मचार्‍यांना कळविण्यात आले आहे.

देशातील सर्वात श्रीमंत समजले जाणारे तिरुपती बालाजी मंदिरही लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटातून जात असल्याचे वृत्त आले होते. बालाजी मंदिरातील सुमारे २२ हजार कर्मचाऱ्यांचे वेतन, देखरेख व सुरक्षेवर ११० कोटी रुपये महिना खर्च होत असतो. मात्र, लॉकडाऊनमुळे मंदिरात भक्तगण येत नसल्याने येणाऱ्या देणग्यादेखील बंद झाल्या आहेत. परिणामी तिरुपती देवस्थानाचे दोन महिन्यांत सुमारे ४०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे तब्बल  21 हजार कर्मचाऱ्यांना या महिन्यात वेळेवर पगार देण्यात आला नसून पगार देण्यास उशीर होईल,असे मंदिर प्रशासनाकडून कर्मचार्‍यांना कळविण्यात आले आहे. 

ही बातमी येताच अनेकांच्या डोक्यात अनेक प्रश्नांचा काहुर माजला असणार, इतका पैसा या मंदिराच्या ट्रस्टने घालवला तरी कुठे? याचे उत्तर मिळणे कठिण असले तरीही सध्या तिरूपती मंदिराच्या ट्रस्टजवळ पैसा नसल्याची माहितीवर जरा विश्वास ठेवणे अशक्यच आहे. एकीकडे तिरुपती बालाजी मंदिरातील कर्मचाऱ्यांसंदर्भात असे वृत्त असताना, दुसरीकडे शिर्डीचे साईबाबाचे देवस्थान मंदिरातील कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहे. 

शिर्डी देवस्थानच्या ट्रस्टने ६ हजार कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचे वेतन देण्यासाठी, मंदिर ट्रस्टची एफडी मोडून सर्वच कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर दिले आहेत. साईबाबा देवस्थान ट्रस्टकडे सुमारे २५०० कोटी रुपयांची एफडी आहे. लॉकडाऊनचा परिणाम शिर्डी साईबाबा मंदिरावरही झाला असून देणग्यांचं प्रमाण घटलं आहे. गेल्या दोन महिन्यांत, केवळ अडीच कोटी रुपयांच्या ऑनलाइन देणग्या मिळाल्या आहेत. एकंदरीत साईबाबा मंदिर संस्थानचे वार्षिक उत्पन्न पाहता ही देणगी रक्कम कमीच आहे. मंदिर ट्रस्टला दरवर्षी सरासरी ७०० कोटी रुपयांचा निधी देगणीस्वरुपात मिळतो. मात्र, लॉकडाऊन काळात हा निधी घटला आहे. तरीही, देवस्थानने कर्मचाऱ्यांसाठी एफडी मोडून त्यांचे वेतन अदा केले. त्यामुळे, देशातील सर्वात श्रीमंत असलेल्या तिरुपती बालाजी देवस्थान ट्रस्टनेही कर्मचाऱ्यांप्रति सहानुभूती दाखवून जमा-शिल्लक किंवा आर्थिक बचतीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या पगार करावेत अशी मत व्यक्त होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या