शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सावधान, राज्यात पुन्हा कोरोनाचा अलर्ट; आरोग्य सचिवांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 08:57 IST

आशिया आणि युरोप खंडात संसर्गाची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना आदेश दिले आहेत.

मुंबई :  राज्यात कोरोनाची तिसरी लाट नुकतीच ओसरत असल्याने, आता कुठे दिलासा मिळाला आहे. मात्र, काही देशांत आता कोरोनाच्या चौथ्या लाटेला सुरुवात झाली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून तापसदृश्य आजार आणि तीव्र श्वसन विकारांच्या आजारांवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी सर्व जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत.आशिया आणि युरोप खंडात संसर्गाची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना आदेश दिले आहेत. तापसदृश्य आजारांची आणि तीव्र श्वसन अडथळ्याचा संसर्ग चाचणी हे सरकारसाठी कोरोना नियंत्रणाचे मुख्य स्तंभ आहेत. आता सजगता वाढवून ताप आणि श्वसनविकाराच्या रुग्णांची कोरोना चाचणी करून, त्यातील पॉझिटिव्ह अहवाल जनुकीय संरचनेच्या तपासणीसाठी पाठवावेत, असे या आदेशात म्हटले आहे.बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांची पालिकेकडून माहिती घेतली जात आहे, तसेच कोरोनाची लक्षणे असल्यास त्याची माहिती गोळा केली जाते. लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांवर वेळीच उपचार करून कोरोना रोखण्याचे नियोजन महापालिकेकडून केले जात आहे. - सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त.पुन्हा आढावा बैठकाकोरोनाच्या तिसऱ्या लाटेने बाधित संख्येत उच्चांक गाठला. मात्र, लसीकरणामुळे रुग्णालयात दाखल करण्याची किंवा मृत्यूची संख्या खूप कमी झाली. आता कोरोनाची तिसरी लाट ओसरली असून, दैनंदिन बाधित संख्या दोन आकडी झाली आहे, तर निर्बंध शिथिल झाले आहेत, तर अखेरची बैठक फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात झाली. एक महिना उसंत नाही मिळत, तोच आशिया आणि युरोप खंडातील चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा बैठका सुरू झाल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस