शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

महागाईचा तडाखा! डिझेलपाठोपाठ कोथिंबीरही १०० रुपयांवर; हिरवी मिरचीही २०० रुपये किलो

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 06:51 IST

वाहतूक खर्च वाढला, भाजीपाल्याचे दर गगनाला

मुंबई : पावसामुळे भाजीपाला खराब झाल्याने बाजारपेठेत आवक कमी आणि वाढता वाहतूक खर्च यामुळे दामदुप्पट दराने भाजीपाला खरेदी करण्याची वेळ नागरिकांवर आलेली आहे. मिरचीचे भाव कडाडून २०० रुपये किलो झाले असून कोथिंबिरीची जुडी ८० ते १००  रुपयांना मिळते आहे. त्याचा बजेटवर परिणाम झाला आहे.अनेक जिल्ह्यांतील ग्रामीण भागातून उत्पादित भाजीपाला कमी येत आहे. त्यातच डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतुकीचा खर्च पाहता भाजीपाला ५० ते १२० रुपये प्रतिकिलोने नागरिकांना खरेदी करावा लागत आहे. गणेशोत्सव, गौरीपूजन, पितृपक्ष आणि नवरात्र उत्सव, दसरा या सणावारात मांसाहार बंद होता. त्यामुळे भाज्यांची विक्री वाढत त्या फार महागल्या आहेत. आधी ५ ते १० रुपये पाव किलो असलेली भाजी आता २० ते २५ रुपयांना खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे अनेक ग्राहक महागलेले दर ऐकून दुकानातून काहीच न घेता माघारी जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.डिझेलचे दर वाढल्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढला. त्यामुळे भाज्या महागल्या आहेत. पाऊसही कमी-जास्त प्रमाणात असून, उत्पादन कमी आहे. त्यामुळे भाव वाढले आहेत- अशोक सकट, भाजीपाला विक्रेतेकिरकोळ बाजारातील किंमत पालक     : ५० रुपये जुडीमेथी     : ५० ते ६० रुपयेभेंडी     : ६० ते ७० रुपयेसिमला मिरची     : ८० रुपयेफूल कोबी     : ८० रुपयेवांगी     : ९० रुपयेगवार     : १२० रुपयेटोमॅटो     : ८० ते १०० रुपयेकांदा     : ५० ते ६० रुपयेबटाटा     : ४० ते ६० रुपये